शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

परवान्याच्या वाढीव दंडातून रिक्षाचालक सुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2016 12:03 AM

आंदोलनास यश : सांगली, मिरजेत चालकांकडून जल्लोष, अधिकाऱ्यांना आदेशाची प्रतीक्षा...

सचिन लाड -- सांगली --रिक्षा परवाने मुदतीत नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षाचालकांना पाच हजारांचा दंड आकारण्याचा शासनाने घेतलेला निर्णय रिक्षाचालकांच्या आंदोलनामुळे अखेर मागे घेतला आहे. पूर्वी केवळ शंभर रुपये दंड आकारला जात होता. यामध्ये आता थोडासा बदल करून मुदत संपल्यानंतर परवाने नूतनीकरण करणाऱ्या चालकांना पहिल्या पंधरा दिवसांसाठी दोनशे रुपये दंड आकारण्याचा नवीन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे सांगली, मिरजेतील रिक्षाचालकांनी स्वागत करून जल्लोष साजरा केला. दोन महिन्यांपूर्वी शासनाने मुदतीत परवाने नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षाचालकांना पाच हजाराचा दंड आकारण्याचा नवीन आदेश काढला होता. याशिवाय पुढील प्रत्येक महिन्यासाठीही वेगळा पाच हजाराचा दंड लावला होता. हा दंड चालकांना न परवडणारा होता. त्यामुळे सांगली जिल्हा चालक मालक रिक्षा संघटना, सांगली जिल्हा प्रवासी अ‍ॅपे रिक्षा संघटना यांनी स्वतंत्रपणे सांगलीत आंदोलन सुरू केले होते. आरटीओ कार्यालयासमोर त्यांनी मोर्चा काढून निदर्शने केली होती. बेमुदत रिक्षा बंद आंदोलन करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. पण दहावीची परीक्षा सुरू असल्याने त्यांनी हा निर्णय १५ मार्चपर्यंत पुढे ढकलला होता. सांगलीसह संपूर्ण राज्यात रिक्षाचालकांनी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केल्याने शासनाला नमते घ्यावे लागले. यासंदर्भात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत रिक्षाचालकांचे नेते बाबा शिंदे, प्रसन्न पटवर्धन यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत रावते यांनी परवाना शुल्क वाढीव दंड कमी केला असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)रिक्षा व्यवसायातून महिन्याला पाच हजार रुपये पगार पडत नाही, अशी स्थिती आहे. असे असताना शासनाने परमिट शुल्क पाच हजार रुपये दंडाचा आदेश काढला. त्याला जिल्हास्तरावर संघटनेने जोरदार विरोध केला. रिक्षाचालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. हे सर्वांचे यश आहे. यापुढेही रिक्षाचालकांच्या प्रश्नावर लढा सुरुच राहील.- महेश चौगुले, अध्यक्ष, सांगली जिल्हा प्रवासी अ‍ॅपे रिक्षा संघटना.सांगलीसह राज्यातील रिक्षा चालकांचा वाढीव परमीट शुल्क रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. अजूनही शासनाकडे रिक्षा चालकांना कल्याणकारी योजना सुरु करण्यासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्नही सोडविण्यासाठी शासनाने प्राधान्य द्यावे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - सुरेश गलांडे, सदस्य, राज्य रिक्षा कृती समितीदंडाचा नवीन निर्णयपहिल्या पंधरा दिवसांसाठी दोनशे रुपयेदोन ते चार महिन्यांसाठी पाचशे रुपयेएक वर्षानंतर पुढील प्रत्येक वर्षासाठी पाच हजार रुपये ट्रकसाठी नॅशनल परवान्यासाठी सातशे रुपयेफिटनेस परवाना प्रतिदिन शंभर रुपये दंडाऐवजी पंधरा दिवसांसाठी शंभर रुपये