शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Sangli News: माजी पंचायत समिती सदस्याला गोळीबारप्रकरणी सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 4:43 PM

राजकीय कारणावरून बिगर परवाना रिव्हॉल्व्हर रोखून धमकी देत, हवेत केला होता गोळीबार

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे राजकीय कारणावरून बिगर परवाना रिव्हॉल्व्हर रोखून धमकी देत, हवेत गोळीबार केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब तुकाराम भंडारे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. भंडारे हा माजी पंचायत समिती सदस्य आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला. भंडारे याच्यासह अन्य आरोपींनाही या प्रकरणात शिक्षा झाली आहे.खटल्याची अधिक माहिती अशी की, २३ मार्च २०१२ रोजी मालगाव येथील सिद्धार्थनगर येथे हा प्रकार घडला होता. आरोपी भंडारे हा आपल्या साथीदारांसह मोटारीतून आला व त्याने फिर्यादी वसंत अप्पासाहेब खांडेकर यांच्याशी वाद घातला. यात ‘तुम्ही आमच्या समाजातील वर्चस्व कमी करताय काय, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे’ असे म्हणून शिवीगाळ सुरू केला. यानंतर बाळासाहेब भंडारे याने बिगर परवाना रिव्हॉल्व्हर खांडेकर यांच्या छातीवर रोखून धमकावत हवेत गोळीबार केला होता. तर रमेश शिवाजी तेलकिरे याने तलवारीने खांडेकर यांच्या तोंडावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. भंडारे याचे इतर साथीदारांनी सिद्धार्थनगर येथील समाज मंदिरासमोर असलेल्या बाकडे तोडून नुकसान केले होते. यानंतर फिर्यादी वसंत खांडेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी खटल्याचे काम पाहिले. या खटल्यात पोलिस हवालदार शामकुमार साळुंखे व पैरवी कक्षातील पोलिसांचे सहकार्य मिळाले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी