भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील सरळी पूल ते मुख्य पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम येत्या आठ दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. यामुळे व्यापाऱ्यांनी १ मार्च रोजी पुकारलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याचे शनिवारी जाहीर केले.
ठेकेदार रुचिर मोहरील यांनी शनिवारी भिलवडीत येऊन चर्चा केली.
येत्या सहा मार्चपर्यंत धुळीचा त्रास पूर्णपणे कमी करण्यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेत आहे. सरळी पूल ते मुख्य पुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण होणार असल्यामुळे धुळीचा त्रास कमी करण्यासाठी तूर्तास डीबीएम लेअरचा रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
बैठकीस संग्राम पाटील, दक्षिण भाग सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव महेश शेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता संकेत पाटील, अभिजित रांजणे, आदी उपस्थित होते.