लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील वाॅर्ड १५ मधील पत्रकारनगरमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची लॅबमधून तपासणी करूनच कामाला सुरुवात झाली.
या परिसरातील रस्ते दुरुस्तीबाबत नागरिकांनी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. चव्हाण यांनी तात्काळ पाठपुरावा करून या रस्ते काँक्रिटीकरणास मंजुरी मिळविली. शनिवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. तज्ज्ञांकडून रस्त्यासाठी वापरात येणाऱ्या कच्च्या मालाची लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. या कामात उत्तम प्रतीच्या मालाचा वापर करण्यात आला आहे. काँक्रिटीकरणच्या देखभालीची जबाबदारी दहा वर्षे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. रस्त्याच्या कामाचया उद्घाटनप्रसंगी नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका पवित्र केरीपाळे, नगरसेविका आरती वळवडे, माजी नगरसेवक हणमंत पवार, विपुल केरीपाळे, ॲड संजय सकळे, अजित सकळे, तेजूभाई लालवानी, मनोज बेले, वरुण जोशी, संदीप ओतारी, अभिजित बर्गे, संतोष शेट्टी, सचिन कुलकर्णी, जयराज बर्गे उपस्थित होते.