दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील गेल्या अनेक वर्षांपासून वाॅर्ड क्रमांक तीनमधील सिराज तांबोळी दुकान ते दिलीप चोथे घर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच पाणी पुरवठा पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन करण्यात येत आहे, अशी माहिती दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी दिली.
ते म्हणाले की, येथील वाॅर्ड क्रमांक तीनमधील रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला होता. अनेकवेळा नागरिकांनी मागणी करून देखील राजकीय अनास्थेमुळे रस्ता प्रलंबित होता. वॉर्डातील सदस्य मुन्ना तांबोळी, बाळासाहेब होनराव, राहुल पांढरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. नळ पाईपलाईन १९८० मध्ये केली होती. सिमेंटची पाईप असल्याने नळातून अस्वच्छ पाणी येत होते. आता नव्या पाईपलाईनमुळे हा प्रश्नही सुटला आहे.
यावेळी मुन्ना तांबोळी, संजय वाघमारे, राहुल पांढरे, विलास शिंदे, अमित डमकले आदी उपस्थित होते.