लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या वॉर्ड क्रमांक ८ मधील विजयनगर रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या प्रश्नाावर रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत महापालिकेने सोमवारी येथील कामास सुरुवात केली.
रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी याप्रश्नी आवाज उठविला होता. विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. यानंतर रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासन जागे झाले. पुलाखालील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे वेटम यांनी सांगितले.
या वॉर्डातील मंगलमूर्ती कॉलनीत गटारी तुंबून पाणी साठणे, हसुरेनगर, वानलेसवाडी, अकुजनगर, विद्यानगर, विलिंग्डन कॉलेज परिसर, विजयनगर, जैन गल्ली, अजंठा कॉलनी, शरदनगर, पाटील मळा, अहिल्यानगर, सैनिकनगर, विनायकनगर, गंगानगर गुरुकृपा कॉलनी, विकास कॉलनी, आदी भागातील नागरिकांच्या रस्ता, वीज याबाबतच्या समस्या सोडविण्याचीही मागणी संघटनेने केली आहे.