शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

डफळापुरात चार ठिकाणी दरोडा

By admin | Published: February 02, 2016 1:24 AM

नऊजणांना मारहाण : सात लाखांचा ऐवज लंपास

डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथे रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून चार ठिकाणी दरोडा टाकत सात लाखांचा ऐवज लंपास केला. दहा ते बाराजणांच्या टोळीने गावाबाहेरच्या वस्तीवरील घरांमध्ये शिरून धारदार हत्यारांचा धाक दाखवीत लूटमार केली. त्यांना प्रतिकार करणाऱ्या नऊजणांना मारहाण करण्यात आली. त्यापैकी सहाजण जबर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे डफळापूर परिसरात घबराट निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तोंडाला स्कार्फ, अंगात जर्कीन घातलेल्या २५ ते ३५ वयाच्या दहा ते बारा दरोडेखोरांनी डफळापूरमध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा गावाबाहेरील वस्तीवरील दीपक विठ्ठल चव्हाण यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. चव्हाण दाम्पत्याला हत्यारांचा धाक दाखवीत दोघांनी रोखून धरले व तिघांनी साहित्य विस्कटून पाच तोळे सोन्याचे दागिने असलेला डबा व कपडे भरलेली सुटकेस पळवून नेली. यावेळी दीपक चव्हाण यांचा आरडाओरडा ऐकून नजीकचे दोघेजण मदतीला आले; पण दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली. मारहाणीत दीपक चव्हाण यांच्या उजव्या हाताला जबर मार लागला. त्यांची कपड्याने भरलेली सुटकेस ज्वारीच्या शेतात सापडली. त्यानंतर दरोडेखोरांनी जयराज रामराव चव्हाण (वय ५५) यांच्या घराकडे मोर्चा वळविला. घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. जयराज चव्हाण व त्यांची दोन मुले शिवराज (१९) व स्वराज चव्हाण (१७) यांनी जोरदार प्रतिकार केला; मात्र दरोडेखोरांनी तिघांना जबर मारहाण केली. बॅटरीचा करंट दिल्याने जयराज चव्हाण गर्भवती महिलेला मारहाण शिवाजी माळी यांची मुलगी अश्विनी राहुल माळी (रा. ताकारी) माहेरी बाळंतपणासाठी आली आहे. दरोडेखोरांनी या गर्भवती महिलेसह आई अनुसया यांनाही मारहाण करीत दोघींच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. पोलीस एका टोकाला, चोरटे दुसऱ्या टोकाला ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जतचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे पथकासह मध्यरात्री दोन वाजता गावात पोहोचले. ते दीपक चव्हाण व जयराज चव्हाण यांच्या घराची पाहणी करीत असताना दरोडेखोरांचा गावाच्या दुसऱ्या टोकाला शिवाजी माळी व शिवबसू तेली यांची घरे फोडण्याचा प्रकार सुरू होता. एकाला ओळखले संजय तेली यांनी जत पोलिसांना पहाटे चार वाजता घटनेबाबत दूरध्वनी केला असता, ‘तुमच्या गावातच पोलीस आले आहेत’, असे त्यांना सांगण्यात आले. तेली यांनी दरोडेखोरांच्या टोळीतील एकाला ओळखले असल्याचे पोलिसांना सांगितले. बाज (ता. जत) येथील एकजण असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.