शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Rohit Patil : 'स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येतेय, आज त्यांनाही आनंद झाला असेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:08 PM

Rohit Patil : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात

सांगली - राज्यातील १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांना दिवंगत नेते आणि वडिल आर.आर. पाटील यांची आठवण झाली.  

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात. विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत, असे रोहित पाटील यांनी विजयानंतर म्हटले आहे. तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असेही ते म्हणाले.   राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली, सुमनताईंच्या अनुपस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला. कवठेमहांकाळातील सुजाण नागरिक, कार्यकर्ते मित्र, सहकारी, पत्रकार, राज्यभरातील हितचिंतक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष  या निवडणूकीत मोलाची मदत केली त्या प्रत्येकांचा हा विजय आहे, असे म्हणत रोहित पाटीय यांनी आपल्या विजयाचे श्रेय सर्वांना दिले.  

राष्ट्रवादी काँग्रेसचा कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. 

रोहित पाटलांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, "निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगलीElectionनिवडणूकNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२