पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले.पलूस येथील श्री समर्थ साहित्य व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने आयोजित सोळाव्या परिवर्तन साहित्य संमेलनात साळेगावकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक प्रा अनिल बोधे यांच्याहस्ते झाले.प्रा. बोधी म्हणाले, शिक्षणाची जी अवस्था आहे, तीच साहित्याची आहे. प्रशासन व्यवस्थेची तपासणी होणे गरजेची आहे. चांगल्या साहित्याचा सन्मान झाला पाहिजे.मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी स्वागत केले. रवींद्र येवले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कवी संजय चौधरी, सुप्रिया जाधव, दिवाकर सदाशिव, संघमित्रा खंडारे यांना तसेच भानुदास आंबी यांच्या काव्यसंग्रहांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. धनदत्त बोरगावे, सुनील तोरणे, किरण सावंत, अशोक पवार, साहेबलाल शेख, संजय पवार, ज्योती मोहळकर, दास मोरे, रमेश खंडागळे, जयश्री शिंदे, बजरंग आंबी, माया गडदे, संजय कुंभार, दि. बा. पाटील आदींचा सत्कार झाला.दुसऱ्या सत्रात ऋषिकेश खारगे, आलिशा मोहिते यांचे ‘संत साहित्य’ या विषयावर विचारमंथन झाले. तिसºया सत्रात चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी व्ही. वाय. पाटील, ज्ञानेश्वर कोळी, डॉ. अमोल पवार, किरण शिंदे, कुमार गायकवाड, संजय तोडकर, रवींद्र येवले, जयवंत मोहिते, शशिकांत रेपाळ आदी उपस्थित होते.लेखणीला सकारात्मक दिशा हवीसाळेगावकर म्हणाले, कृषिविषयक जाणिवा साहित्याच्या सर्व प्रकारातून आल्या आहेत व येत आहेत. घुसमटीचे नवे संदर्भ शोधणाºया सक्षम लेखणीला सकारात्मक दिशा मिळणे गरजेचे आहे.
साहित्यिकांची भूमिका माणसे जोडणारी असावी: प्रभाकर साळेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:40 PM