शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
4
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
5
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
6
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
7
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
8
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
9
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
10
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
11
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
12
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
13
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
14
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
15
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
16
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
17
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
18
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
19
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

गुलाबाचा दर वधारला, ‘व्हॅलेंटाईन डे’साठी मागणी वाढली; रेल्वेने मिरजेतून दिल्लीला निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 2:22 PM

कृत्रिम फुलांची एण्ट्री

सदानंद औंधे

मिरज: ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमदिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यामुळे डच गुलाबाचा दर वधारला आहे. मिरजेतून रेल्वेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे. गेली आठवडाभर मिरजेतून दररोज दोनशे बॉक्स जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाब रेल्वेने दिल्लीला जात आहेत.सांगली जिल्ह्यात मिरज, आष्टा, विटा व कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, कोथळी, नांदणी परिसरातील हरितगृहात जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाबाचे उत्पादन होते. जरबेरा, कार्नेशियन या फुलांना सजावटीसाठी व ‘व्हॅलेंटाईन डे’ला लाल गुलाबाच्या फुलांना मागणी असते. मिरजेतून निजामुद्दीन एक्स्प्रेसने दिल्लीकरांसाठी व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब पाठविला जात आहे. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलांचे उत्पादन नसल्याने दिल्लीला मागणी व दर अधिक आहे. त्यामुळे दिल्लीला निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. या दिवशी प्रेमाच्या जिवलग व्यक्तीला गुलाबाचे फूल देण्याची पद्धत असल्याने व्हॅलेंटाईन साठी लाल गुलाबाचा दर वधारला आहे.

एरव्ही दहा रुपये नगाचा दर असलेल्या डच गुलाबाच्या फुलांना प्रेमदिनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ते वीस रुपये भाव मिळत आहे. जरबेरा व कार्नेशियन या फुलांनाही २० रुपये दर मिळत आहे. मिरजेतून दररोज रात्री गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून दिल्लीला फुले पाठविण्यात येतात. उत्तर भारतात थंड हवामान असल्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दिल्लीला फुले जात आहेत. या फुलांचा दिल्लीत शीतगृहात साठा करण्यात येतो.मिरज रेल्वे स्थानकातून दररोज दोनशे बॉक्स गुलाब व जरबेरा दिल्लीला जात असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेच्या माल वाहतूक भाड्यामुळेही फुलांची निर्यात महाग आहे. फुलांच्या एका बॉक्सला आकारमानाप्रमाणे अडीचशे रुपये आकारणी करण्यात येते. रेल्वेतून फुले पाठविण्यासाठी आकारमानाऐवजी प्रतिकिलो दर आकारणीची निर्यातदारांची मागणी आहे.

कृत्रिम फुलांची एण्ट्रीगेल्या काही वर्षांत व्हॅलेंटाईन डे साठी कृत्रिम फुलांचाही वापर सुरू झाला आहे. कृत्रिम फुले तुलनेने स्वस्त असल्याने मोठ्या शहरात फुलांची मागणी घटत असल्याचे निर्यातदार राजू बागणीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली