फोटो-दत्ता शिंदे देतील
फोटो ओळ - मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत विजयसिंह राजे महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिग्विजय मोहिते, विनायक गायकवाड उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मुंबई येथे २५ जूनला होणारी मराठा आरक्षण गोलमेज परिषद निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा पूर्ण झाला आहे. या गोलमेज परिषदेला मराठा आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समविचारी ४० पेक्षा जास्त मराठा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंहराजे महाडिक यांनी दिली.
येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सरचिटणीस दिग्विजय मोहिते, जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. महाडिक म्हणाले, मराठा आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून येत्या २५ जूनला नवी मुंबईतील माथाडी भवन येथे राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. ही गोलमेज परिषद मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यांच्या बाबतीत एक दिशा देणारी व शासनाविरुद्ध एल्गार करणारी ही परिषद असेल.
ते म्हणाले, या परिषदेला मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ केलेले खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विविध मराठा समाजाचे आमदार, खासदार यांना परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.