शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:19 AM

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कर्जमाफीसाठी शासनाकडून थकबाकीची तारीख जून २०१७ पर्यंतची गृहीत धरली जाईल, अशी आशा बाळगलेले जिल्ह्यातील ४० हजार शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे नव्या कर्जासाठी ते अपात्र ठरले आहेत. या गोंधळात गतवर्षाच्या तुलनेत जिल्हा बॅँकेच्या एकूण खरीप पिकाच्या कर्जवाटपात यंदा १२९ कोटींची घट झाली आहे. सांगली जिल्हा बॅँकेने १४ जुलैअखेर खरीप हंगामासाठी एकूण ३४३ कोटी ७९ लाख ५६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ४७२ कोटी ८६ लाख ३२ हजार कोटींचे कर्जवाटप झाले होते. यावर्षीचे खरीप उद्दिष्ट ५३६ कोटी ७० लाखांचे आहे. जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व अन्य सवलतींच्या योजनेचा लाभ होणार आहे. जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही यात समाविष्ट करून घेतले जाईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे जून २0१६ ते जून २0१७ पर्यंत कर्जाचे हप्ते न भरलेले चाळीस हजारांवर शेतकरी थकबाकीत गेले आहेत. परिणामी ते नव्या कर्जासाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा १२९ कोटी रुपयांची घट कर्जवाटपात दिसून येते. जिल्हा बॅँकेला उद्दिष्टपूर्तीसाठी अजूनही बराच कालावधी असल्याने बॅँकेला या गोष्टीने काही फरक पडणार नाही. याऊलट थकबाकीदार शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत थकबाकी जमा करून नियमित कर्जदारांच्या यादीत जाण्याची व २५ हजारांची सवलत मिळविण्याची त्यांना संधी मिळू शकते. याशिवाय नव्या कर्जासाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अशा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने थकबाकी भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कर्जपुरवठा १५६ कोटी १५ लाख ९७ हजार इतका करण्यात आला आहे. त्याखालोखाल द्राक्ष, सोयाबीन, ज्वारी या पिकांसाठी कर्जपुरवठा केला आहे. गतवर्षाच्या तुलनेत कर्जवाटपाचे आकडे कमी असले तरी, सप्टेंबरपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांनी थकबाकी भरुन अनेक योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा ९७७ कोटींचे उद्दिष्टजिल्हा बँकेला यंदा खरीप व रब्बीचे एकूण पीक कर्ज उद्दिष्ट ९७७ कोटी रुपयांचे आहे. यामध्ये खरिपाचे ५३६ कोटी ७0 लाखांचे, तर रब्बीचे ४४0 कोटी ३0 लाखांचे उद्दिष्ट आहे. खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कोणतीही अडचण जिल्हा बँकेला वाटत नाही. तरीही त्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पेरणी कर्जासाठी मागणी नाहीपेरणी कर्जासाठी जिल्हा बँकेने सर्व तयारी केलेली असताना, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. दीड लाखावर ज्यांचे कर्ज आहे, अशा कर्जदारांनी दीड लाखाव्यतिरिक्त असणारी रक्कम भरल्याशिवाय तो कर्जास पात्र ठरत नाही. त्यामुळे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यासाठी उर्वरित रक्कम जमा करावी लागणार आहे. जिल्हा बँकेने शासनाच्या नियमांच्या आधारेच कर्जवाटपाचे धोरण राबविले आहे. पीकनिहाय कर्जवाटपपीक सभासद कर्जऊस २५,५४९१५६,१५,९७,000द्राक्ष ७,६८९१00,६५,८९,000ज्वारी ६,0६१११,९0,५६,000सोयाबीन३,६५0८,१४,४0,000डाळिंब५,३१६ ३५,९८,९३,000भात ४४६१,0७,८३,000हळद ६४ २७,५९,000भुईमूग४३३९६,५३,000बाजरी १,६५१३,२१,६0,000कापूस ९,0२११६,५५,२३,000