शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तंतुवाद्य कारागीरांसाठी साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान -मिरजेत क्लस्टर योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:23 AM

मिरज : राज्यात एकमेव असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कलेस मदतीसाठी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन ...

ठळक मुद्देशहरातील अर्धा एक जागेत कारागीरांसाठी सामुदायिक केंद्र उभारण्यात येणारइमारतीचे बांधकाम सुरू

मिरज : राज्यात एकमेव असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कलेस मदतीसाठी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत क्लस्टर योजनेसाठी अर्धा एकर जागा देण्यात आली असून, या जागेत इमारतीच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे.

तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कारागीरांच्या अनेक पिढ्या हा व्यवसाय करीत आहेत. महागाई, कच्च्या मालाचे वाढते दर, तंतुवाद्य निर्मितीतून मिळणारे अपुरे उत्पन्न, इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे आक्रमण अशा विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या तंतुवाद्यनिर्मिती कलेस हस्तकलेचा दर्जा देऊन शासनाच्या मदतीसाठी तीन वर्षांपूर्वी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे क्लस्टर योजनेची घोषणा करण्यात आली.

मिरजेतील तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांनी संपूर्ण देशात व परदेशात लौकिक मिळविला आहे. तंतुवाद्याचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबोऱ्यांना विविध मानसन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही आहे; मात्र विविध अडचणींमुळे तंतुवाद्य कारागीरांची संख्या घटत आहे. इलेक्ट्रॉनिक तनपुºयाच्या आक्रमणामुळे तंतुवाद्यनिर्मिती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

तंतुवाद्यांची घटलेली मागणी, कच्च्या मालाचे वाढते दर, अत्यंत कष्टाचे काम व तुटपुंज्या उत्पन्नामुळे कारागीरांची संख्या कमी होऊन नवी पिढी व्यवसायात येण्यासाठी इच्छुक नाही. या पार्श्वभूमीवर लघुउद्योग विकास महामंडळाअंतर्गत तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा देऊन तंतुवाद्यनिर्मिती व्यवसाय टिकविण्यासाठी मिरजेत तीन वर्षापूर्वी क्लस्टर मंजूर करण्यात आले.

क्लस्टर योजनेअंतर्गत कारागीरांना विमा, तंतुवाद्य निर्मात्यांना दुकाने, संशोधन व निर्मितीसाठी जागा उपलब्ध करुन तंतुवाद्यांना बाजार पेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मिरजेतील औद्योगिक वसाहतीत शासनाच्या अर्धा एकर जागेत तंतुवाद्य कारागीरांना सामुदायिक सुविधा केंद्र निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. क्लस्टर योजनेसाठी सुमारे दोनशे तंतुवाद्य कारागीरांची यादी तयार करून मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे.

क्लस्टर योजनेअंतर्गत शासनाचे अनुदान व सुविधा मिळविण्यासाठी ३० टक्के रक्कम कारागीरांना भरली आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कारागीरांच्या सामुदायिक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे मिरज म्युझिकल ईन्स्ट्रुमेंट कंपनीचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी सांगितले.योजना दिलासादायक ठरणारदेशातील अनेक दिग्गज कलाकार मिरजेत तयार झालेल्या सतार व तंबोºयाचा वापर करतात. मिरजेच्या सतार व तंबोºयास परदेशातही मागणी आहे. विशिष्ट, मजबूत, टिकाऊ भोपळ्यामुळे मिरजेतील सतार, तंबोºयाचा देशात लौकिक आहे. मजुरी, कच्च्या मालातही मोठ्या दरवाढीच्या तुलनेत वाद्यांच्या दरात वाढ झालेली नाही. मिरजेतील तंतुवाद्यांना कोलकाता व लखनऊ येथील स्वस्त दराच्या तंतुवाद्याशी स्पर्धा करावी लागते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या तंतुवाद्य व्यवसायासाठी क्लस्टर योजना दिलासा ठरणार आहे.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगली