शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

‘आरटीओे’ने जमविले ८८ कोटी

By admin | Published: March 28, 2016 11:46 PM

दशरथ वाघुले : ओव्हरलोड, रिक्षांसह वडापवर कारवाई

सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे २०१५-१६ या वर्षाचे महसुलाचे उद्दिष्ट क्षमता ओलांडून गेले आहे. शासनाने ७९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. पण ते ८८ कोटींवर गेले आहे, अशी माहिती आरटीओ दशरथ वाघुले यांनी दिली. ओव्हरलोड मालाची वाहतूक, रिक्षांसह अवैध प्रवासी वाहतुकीसह विविध कर वसुलीतून हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, असेही वाघुले यांनी सांगितले.ते म्हणाले, कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमकरता आहे. तरीही कारवाईमध्ये सातत्य ठेवले होते. दहा मोटार वाहन निरीक्षकांच्या जोरावर उद्दिष्ट पूर्ण करुन त्यामध्ये ११ टक्क्यांची वाढ केली आहे. ओव्हरलोड मालाच्या वाहतुकीविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम उघडली होती. यामध्ये एक हजार ११८ वाहने सापडली. त्यांच्याकडून दीड कोटीचा दंड वसूल केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात हजार वाहनधारकांना पकडून दोन कोटी ५५ लाखांचा दंड जमा करुन घेतला. अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्धही वर्षभर कारवाई सुरु राहिली. साडेतीन हजार वाहनांची तपासणी केली. यात सातशे वाहने दोषी आढळली. यातून ६५ लाखांचा दंड वसूल झाला. नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या सातशे रिक्षांवर कारवाई झाली. त्यांच्याकडूृन १५ लाखांचा दंड वसूल केला. ते म्हणाले, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शंभर वाहनांची नोंदणी सहा महिन्यांसाठी निलंबित केली. सव्वादोनशे वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले होते. स्कूल बसचीही सातत्याने तपासणी सुरु राहिली. यामध्ये १२३ बसेस दोषी आढळल्या. एक लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. रिफ्लेक्टर नसलेली तीन हजार वाहने सापडली. यातून एक लाख ३६ हजाराचा दंड वसूल झाला. कर्णकर्कश हॉर्न लावणारी १२३ वाहने सापडली. त्यांचे हॉर्न काढून टाकण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल केला. यासह विविध कारवाईतून ८८ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. (प्रतिनिधी)सांगली अव्वल : साडेआठ कोटींची वाढशासनाने ७९ कोटी ४१ लाखांचे महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. पण आरटीओ कार्यालयाने हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याबरोबर त्यामध्ये साडेआठ कोटींची वाढ केली. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीच्या आरटीओ कार्यालयाने महसूल उद्दिष्टामध्ये बाजी मारली आहे.