लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात २१ आॅगस्टला मुंबईत मंत्रालयात मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. या बैठकीत कार्यालय स्थलांतराबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी शनिवारी दिली. ही जागा महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात असल्याने त्यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.
पवार शनिवारी सांगली दौºयावर होते. त्यांनी आरटीओ कार्यालयास भेट दिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सांगली, कोल्हापूर, सातारा व कºहाड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल ते आॅगस्ट २०१७ या पाच महिन्यांच्या कालावधित २११ कोटी ५४ लाख ९८ हजाराचा महसूल जमा केला आहे. उद्दिष्टापेक्षा ९७ कोटी रुपये जास्त जमा झाले आहेत. येत्या चार महिन्यांत वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश येईल. अपघातामधून स्वत:च्या बचावासाठी वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा. प्रत्येकवर्षी वाहनावर विमा उतरविला पाहिजे. विमा नसलेली वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पाच महिन्यात विभागात अडीच हजार वाहने जप्त केली आहेत. विमा उतविल्याशिवाय वाहने सोडली जाणार नाहीत. तसेच चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) तीन महिने रद्द केले जाणार आहे. वाहनधारकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.अपघाताचा सर्व्हे : उपाययोजना होणारपवार म्हणाले, जिल्ह्यात कोण-कोणत्या मार्गावर पाचपेक्षा जादा अपघात झाले असतील, तर त्या मार्गाचा आरटीओ, पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तरित्या सर्व्हे करुन ही ठिकाणे ‘ब्लॅक स्पॉट’ ठरवायची आहेत. याठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी याठिकाणच्या पाचशे मीटर परिसरात उपाययोजना करायच्या आहेत. हे काम लवकरच सुरु केले जाईल.पुस्तकांचे वाटपपवार म्हणाले, वाहतूक नियमांची शाळकरी मुलांना आतापासूनच माहिती व्हावी, यासाठी ‘प्रकाश वाटेकडे सुरक्षित प्रवास’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. कोल्हापुरातील शाळांमध्ये दोन हजार पुस्तकांचे वाटप केले आहे. सांगलीतील शाळांमध्ये एक हजार पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. हा कार्यक्रम लवकरच घेतला जाईल.विभागातील कारवाईकेसेस संख्यावाहनाचा फिटनेस : ६, ६५४ओव्हरलोड : ४६४अवैध प्रवासी वाहतूक : ३११९हेल्मेट : ५२९अन्य विविध कारवाया : २७७९लायसन्स निलंबित : १0१४जप्त वाहने : २७७९परवाने निलंबित : ३0१