सांगली : कोरोनाची तपासणीसाठी आवश्यक असलेल्या आरटीपीसीआर तपासणीचे दर आता शासनाने निश्चित केले आहेत. यापूर्वी केलेल्या दरात आणखी बदल केलेले दर प्रयोगशाळांना बंधनकारक असणार आहेत.
शासनाच्यावतीने एनएबीएल व आयसीएमआरकडून आरटीपीसीआर तपासणीचे नव्याने दर निश्चित करण्यात आले आहेत.
दर पुढीलप्रमाणे असणार आहेत. स्वॅब घेण्याच्या ठिकाणापासून वाहतूक खर्चासह ज्या ठिकाणापर्यंत सुधारित दर ५०० रुपये, कोविड केअर सेंटर, रूग्णालय, अलगीकरण कक्ष ६०० रुपये, रुग्णाच्या राहण्याच्या ठिकाणापासून वाहतूक खर्चासह ज्या ठिकाणापर्यंत पाठविण्यापर्यंत सुधारित दर ८०० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे.
रॅपिड अँटिजेन रुग्ण स्वत:हून प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – २५० रुपये, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास – ३००, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास ४०० रुपये, रुग्ण स्वत:हून प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास ३५० रुपये, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित तपासणी नमुने
घेतल्यास ४५० रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास ५५० रुपये दर असणार असून इतरही चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.