Russia Ukraine War: परतीचा प्रवास काळरात्रच... दोन्ही मुलींना मिठीत घेताना कुटुंबीयांना आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 10:14 PM2022-03-04T22:14:19+5:302022-03-04T22:15:06+5:30

चर्णीवस्ती येथे होस्टेल मध्ये आम्ही राहात होतो.

Russia Ukraine War: The return journey is dark night ... Tears of joy to the family while embracing both the girls from ukrain in sangli | Russia Ukraine War: परतीचा प्रवास काळरात्रच... दोन्ही मुलींना मिठीत घेताना कुटुंबीयांना आनंदाश्रू

Russia Ukraine War: परतीचा प्रवास काळरात्रच... दोन्ही मुलींना मिठीत घेताना कुटुंबीयांना आनंदाश्रू

Next

वाटेगाव :  वाटेगाव(ता वाळवा) येथील साक्षी व श्रध्दा महावीर शेटे या विद्यार्थीनी युक्रेनहून मायदेशी वाटेगाव येथे ९व्या दिवशी सकाळी ११ वाजता दाखल झाल्या. या दोघींना मिठीत घेताना संपूर्ण कुटुंबाला आनंदाश्रू अनावर झाले. वाटेगाव (ता वाळवा) येथील साक्षी व श्रध्दा महावीर शेटे लोकमत प्रतिनिधीशी युक्रेनमधून परतत असतानाचे अनुभव सांगताना म्हणाल्या. आम्हाला युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाऊन तिनच महिने झाले होते. युक्रेनमध्ये बुकोविनियन स्टेट मेडीकल विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आम्हा दोघी बहिणची निवड झाली होती. 
 
चर्णीवस्ती येथे होस्टेल मध्ये आम्ही राहात होतो. अभ्यासक्रमाची सुरुवात झाली होती, तोच भारतीय दुतावासाकडून रशिया व युक्रेन युद्धाबाबतची व्हॉट्सअॅपवर नोटिस आली, आम्ही भारतात येण्यासाठीची २५ फेब्रुवारीची  दोघींची तिकीटे बुक केली. २३ फेब्रुवारीला आम्ही दोघी बहिणी ५२० किलोमीटरवर असलेल्या किव्ह विमानतळाकडे निघालो. युक्रेनची राजधानी किव्ही विमानतळावर येत असताना विमानतळापासून २० किलोमीटर लांब असताना विमानतळावर बॉबहल्ला झाल्याची बातमी टॅक्सी मध्येच प्रवासात दुतावासाकडून व्हॉट्सअॅपवर समजलेली. आम्ही सर्वजण भयभीत झालो. गावाकडून आई,वडील व कुंटुबातील सर्वांचे फोन वाजू लागले वारंवार चौकशी होवू लागली. 

परतीचा प्रवास म्हणजे काळरात्र होती, परतीच्या प्रवासात त्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत भयान काळोखात ट्रॅफिक जाम जाम झाल्याने बारा तासात आमची टॅक्सी दहा किलोमीटर पुढे सरकली होती. रशियाने सायबर हल्ला केल्याने आम्हाला फोनला नेट मिळत नव्हते, आम्हाला कोणासही संपर्क करता येत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ ला भारतीय दुतावासाकडून भारताकडे जाणाऱ्यांची लिस्ट आली. दुसऱ्या लिस्ट मध्ये माझे (श्रध्दा) नाव तर तिसऱ्या लिस्ट मध्ये बहिणी साक्षीचे नाव होते. त्याच दिवशी रात्री १० वाजता मि युक्रेनची सिमा पार केली. रुमानियाला गेले शनिवारी दुपारी ४ वाजता विमानाचे उड्डाण भारताकडे झाले. रविवारी पहाटे ३ वाजता (श्रध्दा) दिल्लीला विमान पोहोचले. तर साक्षी मंगळवारी दि १मार्च रोजी पहाटे ३ वाजता दिल्लीत पोहचली. बुधवार दि २ मार्च ला १ वाजता पुणे येथे पोहचली 

१० किलोमीटर पायी प्रवास

युक्रेन मधील चर्णीवस्ती येथून रुमानिया बॉर्डर पर्यंत बसने प्रवास केला तर रुमानिया बॉर्डर पासून युक्रेन कडील बाजूला १० कि मी ट्रॅफिक जाम झाले ने कडाक्याच्या (उने ३ते ४ तापमान) थंडीत पायी प्रवास करत बॉर्डरवर पोहोचले. बॉर्डरवर युक्रेनीयन नागरिक व विविध देशातील विद्यार्थी यांची प्रचंड मोठी गर्दी रुमानियामध्ये जाण्यासाठी झाली होती. प्रत्येक जण रुमानियामध्ये जाण्यासाठी धडपड करीत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवणे (सोल्जर) जवानांनी हवेत गोळीबार केला, तेव्हा झालेल्या चेगरांचेगरीत  साक्षीच्या पहायला दुखापत झाली. तशीच लंगंडत बॉर्डर पास केली व रुमानिया विमानतळावर पोहोचले. तेथुन मंगळवारी दिल्लीत, बुधवारी पुण्यात पुण्यातू श्रध्दा व साक्षी दोघेही शुक्रवारी ११ वाजता वाटेगावला पोहोचले. 

युक्रेनमध्ये माणुसकीचे दर्शन
 
युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने सर्व मॉल दुकाने हॉटेल बंद होती. युक्रेनीयन नागरिक विद्यार्थ्यांना बिस्किटे, फ्रुट, कॉफी, पाणी याचे फ्रि वाटप करत होते. तसेच, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली भारतीय आहेत व हातात तिरंगा आहे म्हणून चांगला प्रतिसाद मिळत होता. रुमानिया बॉर्डर पर्यंतचा प्रवासखर्च आम्हाला करावा लागला. रुमानिया ते दिल्ली पर्यंतचा खर्च भारत सरकारने केला, तर दिल्ली ते पुणेपर्यंतचा प्रवास खर्च महाराष्ट्र सरकारने केला. 

भारत सरकारच्या प्रयत्नामुळे माझा व माझ्या कुंटुबाचा जीव का प्राण असलेल्या साक्षी व श्रध्दा या दोन्ही मुली वाटेगावपर्यंत घरी सुखरूप पोहोच केल्यामुळेच मला व कुंटुबाला पहावयास मिळाल्या. यामध्ये भारत सरकारचे व महाराष्ट्र सरकारचे प्रचंड मोठे योगदान आहे. ग्रामस्त व शेटे कुटुंबाच्यावतीने भारत सरकारचे व पंतप्रधान मोदींचे आभार. 
        महावीर शेटे - वाटेगाव (ता वाळवा जि सांगली )
 

Web Title: Russia Ukraine War: The return journey is dark night ... Tears of joy to the family while embracing both the girls from ukrain in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.