शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

मंत्री तानाजी सावंत, हसन मुश्रीफ यांची हकालपट्टी करा, माकपची मागणी

By संतोष भिसे | Published: October 10, 2023 3:28 PM

शासकीय रुग्णालयात बळी गेलेल्या मृतांच्या वारसांना १० लाखांची भरपाई द्या

सांगली : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षांनी केली. शासकीय रुग्णालयांतील अनागोंदी, गैरकारभार आणि बेफिकीर धोरणांविरोधात मंगळवारी स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली, त्यावेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात आला.किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी नेतृत्व केले. त्यांनी आरोप केला की, नांदेडसह राज्यातील विविध जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांत रुग्णांचे होणारे मृत्यू सरकारचे अपयश दाखवतात. सत्ताकारणात रमलेल्या राजकीय मंडळींना रुग्णांच्या जिविताशी देणेघेणे नाही. रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार धरुन सावंत व मुश्रीफ यांची मंत्रीपदांवरुन हकालपट्टी करावी. यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यातील मागण्या अशा : शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणामुळे बळी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये भरपाई द्यावी. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले खासदार हेमंत पाटील यांना त्वरित अटक करा. शासकीय रुग्णालयांतील मृत्यूंच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सक्षम चौकशी समिती नियुक्त करा, न्याय्य तपासाविना कोणत्याही निरपराध कर्मचाऱ्यावर कारवाई करू नका. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी भरीव आर्थिक तरतूद करा. ती सुधारण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी.आंदोलनात विजय बचाटे, भूपाल जोडहट्टी, सतीश साखळकर, वर्षा गडचे, नंदकुमार हत्तीकर, वर्षा ढोबळे आदी सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीTanaji Sawantतानाजी सावंतHasan Mushrifहसन मुश्रीफ