शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

सदाभाऊ,दुसऱ्याच्या पायरीवर का बसताय?

By admin | Published: June 23, 2016 12:21 AM

अनिल बाबर : विट्यात पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग

विटा : मान्सूनप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. खरीप पेरण्यांसाठी कुऱ्या तयार ठेवल्या आहेत. तशाच निवडणुकीसाठीही कुऱ्या तयार ठेवा, असे आवाहन आ. अनिल बाबर यांनी केले. त्याचवेळी मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय, असा टोलाही त्यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांना लगावला.विटा येथील शिवाजीनगर येथे आमदार फंडातून मंजूर करण्यात आलेल्या रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी आ. बाबर बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. ते म्हणाले की, विकासाचा अजेंडा व नागरीकरणाच्या उपाययोजना घेऊनच नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे आता मागील चूक न करता सर्वसामान्य नागरिकांची विटा नगरपरिषदेत सत्ता आणण्यासाठी विटेकरांनी साथ द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची जबाबदारी मी घेतली आहे. टेंभूचे पाणी येत्या दोन महिन्यात ढवळेश्वर तलावात सोडणार आहे.माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय? याचे उत्तर जनतेलाच दिले तर बरे होईल.यावेळी माजी उपसभापती सुहास बाबर, विनोद गुळवणी, सुखदेव शितोळे, तानाजी बाबर, राजू जाधव, पंचायत समितीचे उपसभापती किसन सावंत, उत्तम चोथे, प्रवीण गायकवाड, अमर शितोळे, मकरंद गायकवाड, धनाजी बाबर, विनायक शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रासकर, शिवाजीराव हारूगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)विटा पालिकेत परिवर्तन अटळयावेळी सुहास बाबर यांनी विटा नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पालिकेची विरोधकांकडे सत्ता आहे. ते एका शहराचा विचार करतात, पण पंचायत समितीच्या माध्यमातून माझ्याकडे ६५ गावांचे लोक येतात. कोणतीही तक्रार नाही. परंतु, नगरपरिषदेत दररोज तक्रारी आहेत. पंचायत समितीत निर्भयपणे माणूस जातो, तसा नगरपरिषदेत जात नाही. गत निवडणुकीत आमच्याकडे काहीही नसताना मिळेल त्यांना घेऊन निवडणूक लढविली. आता ही प्रगती व परिवर्तनाची लढाई आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत परिवर्तन होईलच.