शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सदाभाऊंचा मुद्दा गौण

By admin | Published: June 12, 2017 11:42 PM

सदाभाऊंचा मुद्दा गौण

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकरी आंदोलनाच्या यशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम होत आहे. संघटनेचा विचार पुढे नेणारे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. सदाभाऊंचा मुद्दा आमच्यादृष्टीने गौण आहे. घात आल्यानंतर पेरणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल, तरच उगवण चांगली होईल, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत मारला. भाजपने कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली आहे. मात्र प्रत्यक्ष कृतीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपबद्दल अडीच वर्षांच्या सहवासानंतर आमची मते तयार झाली आहेत. त्यामुळे एक मागणी मान्य झाल्यावर आमची मते बदलणार नाहीत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर मुंबईतून परतलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी कार्यकर्त्यांसमवेत इस्लामपूर शहरातून रॅली काढली. पंचायत समितीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तहसील कचेरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २ जूनच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरकारची ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने हे आंदोलन पुढे सुरू राहिले. थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन कर्ज मिळणे अवघड होते. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणे, हा आमचा आग्रह सरकारने मान्य केला. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बड्या कर्जदारांना लाभ न देण्याच्या मुद्द्यावर सरकार ठाम होते. आमचा लढा सामान्य शेतकऱ्यांसाठी असल्याने तसेच जो शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे यासाठी होता. नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील कमी दर, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी कर्जातच रहात होता. शेतीचा व्याप जेवढा मोठा, तेवढे कर्जही मोठे, या न्यायानेही या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा.ते म्हणाले की, सातवा वेतन आयोग घेणारे कर्मचारी, ठेकेदार, आयकर भरणारे अशा विविध निकषांवर कर्जमाफी निश्चित केली जाणार आहे. कर्जमाफीत शेतीची मर्यादा काढून टाकली आहे. पीक कर्ज माफ करण्याचा प्रामुख्याने विचार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. सरकार कर्जमाफीसाठी तरतूद करेल. कर्जमाफीबाबतच्या कार्यवाहीसाठी एक-दोन दिवसात समिती गठित केली जाईल. २५ जुलैच्या आत कार्यवाही झाली नाही, तर २६ जुलैपासून पुन्हा आंदोलन करणार आहोत.स्वामिनाथन् आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दबाव गट राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारच नाहीत, यासाठी स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे हाच एकमेव उपाय आहे. १६ जूनरोजी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन चळवळीचा दबाव गट निर्माण करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.शेतकरी आंदोलनाचा काहींना प्रसाद!शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील काही नेत्यांना प्रसाद मिळाला आहे. आता शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांत जाणारा भाजीपाला पुरवठा रोखून रेल रोको, चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा खा. शेट्टी यांनी दिला.