काटा; काठी, कुºहाडीने वार सांगली : अवघ्या तीन गुंठे जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाचा भरदिवसा थरारक पाठलागानंतर काठी व कुºहाडीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. संतोष शिवाप्पा तेवरे (वय २४, रा. काकानगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. कर्नाळ रस्त्यावरील साईसरगम ढाब्याजवळील परशुराम संकपाळ यांच्या चुना भट्टीत आज, शुक्रवारी दुपारी पावणेदोनला ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर तेजस आप्पासाहेब तेवरे (रा. जामवाडी) व अनोळखी संशयित या दोघांनी पलायन केले आहे. तेवरे कुटुंब मूळचे अथणीचे आहे. चाळीस वर्षापूर्वी ते सांगलीत उदरनिर्वाहासाठी आले आहे. संतोषचे वडील व संशयित तेजसचे वडील मार्केट यार्डात हमाली करीत होते. तेजसच्या वडिलांनी काकानगर येथे तीन गुंठे जमीन घेतली होती. यातील दीड गुंठे जमीन आपल्याला द्यावी, अशी संतोष मागणी करीत होता. यातून त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून तीन महिन्यांपूर्वी संतोष व त्याचा भाऊ प्रशांत या दोघांनी तेजसला काठीने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. संतोषच्या घराचे बांधकाम सुरू आहे. यासाठी फरशी आणण्यास तो भाऊ राजू याला घेऊन टिंबर एरियात गेला होता. फरशी घेतल्यानंतर संतोषने राजूला ‘हॉटेलमध्ये जेवण करून येतो, तु पुढे जा,’ असे सांगितले. यामुळे राजू फरशी घेऊन घरी गेला. त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण करून संतोष घराकडे निघाला होता. संशयित तेजसने साथीदाराच्या मदतीने त्याला चुना भट्टीसमोर मुख्य रस्त्यावर गाठले. जमिनीचा वाद व पूर्वी झालेल्या मारहाणीचा जाब विचारून त्याने मारहाण सुरू केली. त्यांच्या हातात काठी व कुºहाड होती. जीव वाचविण्यासाठी संतोष चुना भट्टीकडे पळत गेला. कामगार जेवायला गेल्याने भट्टी बंद होती. संशयितांनी त्याला पकडून डोक्यात हल्ला केला. दुपारी पावणेदोनला भट्टीचे मालक परशुराम संकपाळ आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कर्नाळ रस्त्यावर कुणाचा तरी खून झाला आहे, असे राजूला समजले. कोणाचा खून झाला आहे, हे पाहण्यासाठी तो गेला. त्यावेळी संतोषचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. (प्रतिनिधी)
सांगलीत तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून
By admin | Published: May 24, 2014 12:41 AM