सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. पक्षाच्यावतीने सर्व जागा लढविल्या जाणार असून, यंदा महापालिकेवर भगवा फडकणार, असा विश्वास जिल्ह्याचे संपर्क नेते नितीन बानुगडे-पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.येथे शिवसेनेचे गटप्रमुख, पदाधिकारी, मतदान बुथप्रमुख यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस मार्गदर्शक विजय वरूडकर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, नगरसेवक शेखर माने, जिल्हा संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव, सुनीता मोरे, अश्विनी कांबळे, उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर उपस्थित होते.बानुगडे पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे. शिवसेनेने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. पक्ष कुठेही कमी पडणार नाही, आता पक्षासाठी कार्यकर्त्यांनी योगदान देणे आवश्यक आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.विजय वरुडकर यांनीही गटप्रमुख व बुथप्रमुखांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एका महिन्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गनिमीकावा हवा, मतदार संघाची आधी पूर्ण ओळख हवी. किती आडनावांचे किती मतदार आहेत, याची यादीही आता उपलब्ध आहे. मतदारसंघ समजून घेण्यासाठी अभ्यास करावा. उमेदवारांनी मतदारसंघाच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत. यासाठी मतदार समीक्षा अभियान राबवा. सोशल मीडियाचा वापर, मतदार शोध मोहीमही राबवा. पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. अन्य पक्षात काय चाललेय याचाही अभ्यास करा, अशाही सूचना त्यांनी केल्या.जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले, शिवसेनेने ही पालिका निवडणूक स्वबळावर लढवायचे ठरवले आहे. त्यादृष्टीने तयारी झाली आहे. वॉर रुम तयार केल्या आहेत. राजकीय दारिद्र्य संपवायचे असेल, तर हीच संधी आहे. शेखर माने म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीनिमित्त दिशा देण्याचे काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केले जात आहे.दरम्यान, सायंकाळी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री रामदास कदम व नितीन बानुगडे-पाटील यांच्याहस्ते झाले.पदाधिकाºयांना गांभीर्य नाही : विभुतेसांगली महापालिका निवडणुकीत शिवसेना गांभीर्याने उतरली आहे. पण काही पदाधिकाºयांनी अजूनही निवडणूक गांभीर्याने घेतलेली नाही. राजकीय स्वराज्य निर्माण करण्यासाठी पदाधिकाºयांना ही निवडणूक संधी आहे, अशा शब्दात संजय विभुते यांनी पदाधिकाºयांना खडसावले.