शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

सांगली महापालिकेच्या २०६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनकपातीचे आदेश; आयुक्तांचा दणका 

By शीतल पाटील | Published: October 12, 2023 11:20 AM

सांगली : शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत ‘स्वच्छताही सेवा- २०२३’ कार्यक्रमास गैरहजर राहणारे अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षक, ...

सांगली : शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत ‘स्वच्छताही सेवा- २०२३’ कार्यक्रमास गैरहजर राहणारे अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षक, सहायक संचालक नगररचना, सहायक आयुक्त, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह तब्बल २०६ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनकपातीचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी दिले. या कारवाईमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेत महापालिकेचे तब्बल शंभरहून अधिक सफाई कर्मचारीही गैरहजर होते.मागील १ ऑक्टोबर रोजी शासनाने देशव्यापी स्वच्छता मोहीम जाहीर केली होती. आयुक्त सुनिल पवार यांनी याबाबत खातेप्रमुख, अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची दोन-तीनवेळा बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या दिवशी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश दिले होते. असे असताना लाख-दीड लाख रुपये वेतन असणाऱ्या प्रतिनियुक्तीवरच्या अधिकाऱ्यांनीही दांडी मारली. सफाई कर्मचाऱ्यांनीही या अभियानाकडे पाठ फिरवली. यात मानधनावरचे कर्मचारीही मोठ्या संख्येने गैरहजर होते. आयुक्त पवार यांनी या दिवशी गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अहवाल मागवला. यानंतर या सर्व त्यांचे एक दिवसाचे वेतनकपातीचे आदेश काढले.उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की, शासनाने स्वच्छता पंधरवडाअंतर्गत स्वच्छता ही सेवा-२०२३ हा उपक्रम महात्मा गांधींना त्यांच्या जन्माच्या पूर्वसंध्येला आदरांजली म्हणून देशभरात १ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला होता.हा उपक्रम सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे नियाेजन हाेते. यासाठी सर्व विभागांतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या स्वच्छतेच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्षात कामकाज करण्याबाबत आयुक्तांचे निर्देश होते. तरीही उपस्थित न राहिल्याने कारवाई करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Sangliसांगली