कृष्णा व्हॅली चेंबरच्या संचालकांची मुदत संपल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संस्थेच्या १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्थेच्यावतीने २२० सभासदांना निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. २७५ सभासदांना मतदानाचा अधिकार दिला आहे. संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर २६ ते ३० डिसेंबरअखेर अर्ज वितरित करण्यात आले. बुधवारी अखेरच्या दिवशी चेंबरच्या १७ सभासदांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज नेले आहेत. ३१ डिसेंबरपासून ६ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत ११ जानेवारीस दुपारी तीनपर्यंत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी १३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २० जानेवारीरोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानानंतर त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.
कृष्णा व्हॅली चेंबरच्या निवडणुकीसाठी १७ अर्जांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:26 AM