अशोक डोंबाळेसांगली : केंद्रीय कीटकनाशक मंडळ अर्थात सीआयबीची (सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड) मान्यता नसलेल्या ६० टक्के जैविक कीटकनाशकांची जिल्ह्यात विक्री होत आहे. याचा फटका निर्यातक्षम द्राक्षांना सर्वाधिक बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केंद्रीय कीटकनाशक मंडळाने प्रमाणित केलेल्या कीटकनाशकांचाच वापर करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांचा आहे.
कीटकनाशके खरेदीपूर्वी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी
- शेतकऱ्यांनी सर्वप्रथम अनोळखी किंवा रस्त्यावर विनापरवाना कीटकनाशकाची खरेदी करू नये.
- कीटकनाशके ही नेहमी परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत
- पूर्णहंगामाकरिता आवश्यक असलेली कीटकनाशके मोठ्या प्रमाणात खरेदी करू नये
- कीटकनाशके खरेदीपूर्वी कीटकनाशकांचे बॅच क्रमांक केंद्रीय कीटकनाशक नोंदणी मंडळाचे नोंदणी क्रमांक, उत्पादन तारीख, अंतिम तारीख पाहूनच खरेदी करावीत
- कीटकनाशक वापराची अंतिम तारीख संपलेली अथवा अंतिम तारखेचे कीटकनाशके खरेदी करू नयेत
बंदी असलेल्या कीडनाशकाची फवारणी टाळाप्रत्येक कीडनाशकाचे पीएचआय (काढणीपूर्व प्रतीक्षा काळ) केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडे नोंदणीच्या वेळी मंजूर केलेला असतो. त्याची माहिती पत्रकात दिलेली असते. त्याप्रमाणे कीडनाशकाची निवड करून फवारणी करण्याची गरज आहे. बंदी घातलेल्या कीडनाशकांचा तसेच शिफारस न केलेल्या कीडनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी करु नये, असे आवाहन जिल्हा मोहीम अधिकारी स्वप्नील माने यांनी केले आहे.भेसळयुक्त कीटकनाशकांचे प्रमाण अधिकमान्यता नसलेली कीटकनाशके कीटकनाशक अधिनियम १९६८ नुसार बोगसच आहेत. बोगस कीटकनाशके विक्री करणाऱ्या अनेक दुकानांचे परवाने निलंबित केले होते. यात काही कंपन्या दर्जेदार कीटकनाशके देत असतील, पण भेसळयुक्त कीटकनाशकांचे प्रमाण अधिक असते. यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले