ओझर्डे येथील शेतकरी अमोल जानकर यांनी अडीच वर्षांपूर्वी हा रेडा लहान असताना अवघ्या १५ हजार रुपयांना खरेदी केला होता. म्हैशींची पैदास करण्यासाठी याचा उपयोग होत आहे. चार महिन्यांपासून या मुरा जातीच्या उत्तम तब्बेत असणाऱ्या रेड्याची खरेदी करण्यासाठी अनेक जण मागणी करत होते. साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंत किंमत मिळावी, अशी मालकाची अपेक्षा होती. दररोज या रेड्याच्या आहारासाठी सरकी व शेंगदाणा पेंड वापरत होते. ओला व सुका चारा पंधरा किलो लागत असे.
सध्या कोरोना परिस्थितीत या मुरा जातीच्या चार दाती रेड्यास एक लाख रुपये ही चांगली किंमत आल्याची चर्चा आहे. लॉकडाऊन नसता तर दीड लाखावर किंमत मिळाली असती, असे मत अमोल जानकर यांनी व्यक्त केले.