जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्याबरोबरच म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढत आहेत. सध्या १०३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांत भीतीचे वातावरण आहे. या बुरशीजन्य रोगावरील इंजेक्शन जिल्ह्यात पूर्वी १ हजार ७७२ रुपयाला मिळत होते. आता रुग्णांची संख्या वाढताच इंजेक्शनच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या हे इंजेक्शन ७ हजार ७४० रुपयांना दिले जात आहेत. आधीच कोरोनावरील उपचारांमुळे नातेवाइकांची आर्थिक घुसमट झाली आहे. त्यात पुन्हा म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी पैसे खर्च होणार असल्याने नातेवाइकांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे हे इंजेक्शन रुग्णांना शासनाच्यावतीने मोफत उपलब्ध करून द्यावे, असेही माने म्हणाले.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयात रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. त्यासाठी या रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रुग्ण व नातेवाइकांचा संवाद घडवावा, अशी मागणीही त्यांनी केली.