फाेटाे : ०७ गणेश कलगुटगी
फाेटाे : ०७ प्रथमेश ढेरे
फाेटाे : ०७ चेतन कलगुटगी
फाेटाे : ०७ अनिस शेख
मिरज : मिरज शहरात टोळी निर्माण करून खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत, खंडणीसाठी अपहरण करणे आदी सहा गंंभीर गुन्हे दाखल असलेल्या सलीम पठाण टोळीला सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांतून एक वर्षापासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी हद्दपार केले.
सलीम गौस पठाण (वय ३१, रा. मंगळवार पेठ, मिरज), गणेश ऊर्फ निहाल तानाजी कलगुटगी (३१, वडर गल्ली, मिरज), प्रथमेश सुरेश ढेरे (२०, रा. मंगळवार पेठ, मिरज), चेतन सुरेश कलगुटगी (३४, रा. वडर गल्ली, मिरज) आणि अनिस शब्बीर शेख (२५, रा. ख्वाजा वस्ती, मिरज) अशी त्यांची नावे आहेत.
सलीम पठाण याच्या टोळीने मिरज शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहशत निर्माण केली होती. त्याच्या टोळीने २०१७ ते २०२१ दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्राने खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणीसाठी अपहरण केले होते. मंगळवार पेठ, वडर गल्ली य परिसरासह मिरज शहर व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलीम पठाण याच्या टोळीने छोटे-मोठे गुन्हे व मोठी दहशत निर्माण केली होती. मंगळवार पेठेत टोळीने चांगलेच बस्तान बसविले होते. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे मिरज शहर पोलीस निरीक्षक राजू
ताशिलदार यांनी या पाचजणांविरुद्ध जिल्ह्यातून तडिपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक गेडाम यांनी या प्रस्तावावर सुनावणी घेऊन या टोळीस तीन जिल्ह्यांतून तडिपारीचे आदेश दिले.