सलगरेत सरपंचांनी ऑक्सिजन बेडसह मदनभाऊ पाटील नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे.
फोटो ओळ :
सलगरेत सरपंचांनी ऑक्सिजन बेडसह मदनभाऊ पाटील नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे.
लिंगनूर : सलगरे (ता. मिरज) येथील सरपंच तानाजीराव पाटील यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कंबर कसली आहे. मदनभाऊ पाटील कोविड सेंटर आता दुसऱ्या लाटेतही सुरू केले आहे. मिरज पूर्व भागातील ग्रामीण भागात थेट २० ऑक्सिजन बेड्स सुरू करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच सरपंच ठरले आहेत.
सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच सुरेश कोळेकर, ग्रामविकास अधिकारी बी. एल. पाटील, खंडेराजुरी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुहास शिंदे नियोजन व समन्वय पाहत आहेत. गरज भासली की तात्काळ एम. डी. डॉक्टर्सचेही मार्गदर्शन घेतले जाईल, असे सरपंच पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्टोबर महिन्यात हे सेंटर ऑक्सिजन बेड्ससह सुरू करण्यात आले होते. सध्या येथे नर्स व वॉर्डबॉय, वेळापत्रकानुसार खासगी डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. ऑक्सिजन बेडची सुविधा केल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. हे सेंटर लोकसहभागातून सुरू केले असल्याने, खर्च भागावा म्हणून ऑक्सिजन व सर्वसाधारण बेड शासकीय दराच्या पन्नास टक्के सवलतीत ही रुग्णसेवा सुरू राहील, असे सरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले.