सांगलीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिल्याचं अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या भाषणात म्हटलं होतं. त्याच विधानाचा शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान ह्युस्टनच्या भाषणात म्हणतात, भारतानं सगळ्यांना बुद्ध दिला. बुद्ध दिला, पण उपयोग होईल असा नाही.शिवाजी महाराज, संभाजी महाराजच देशाचा खरा संचार करू शकतात. विश्वाचा संचार सुखानं चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत. बुद्ध उपयोगाचा नाही. पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मोदींनी हे विधान केलं होतं. ते म्हणाल होते, भारताने युद्ध नाही बुद्ध दिला. भारतानं कधीही कुणावर आक्रमण केलं नाही. भारत हा शांतताप्रिय देश आहे. पण आपल्याला दहशतावादाचा कठोरपणे मुकाबला करणे आवश्यक आहे. मानवतेसाठी आपल्याला दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं.