शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

संपर्कक्रांती एक्स्प्रेसला सांगलीशी संपर्क ठेवण्याचे वावडे का?, महाराष्ट्राच्या वाट्याला तीनच थांबे

By अविनाश कोळी | Published: February 03, 2024 1:51 PM

प्रवासी संघटनांची मागणी दुर्लक्षित

अविनाश कोळीसांगली : देशभरातील बहुतांश संपर्कक्रांती एक्स्प्रेस गाड्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांना झुकते माप दिले आहे. सांगली स्थानकावर या गाडीचा थांबा मागितल्यानंतर अस्तित्वात नसलेल्या नियमाकडे बोट दाखवले जाते. त्यामुळे संपर्कक्रांतीचा सांगलीशी संपर्क होणार की नाही? असा प्रश्न प्रवासी संघटनांमधून विचारला जात आहे.सांगली हे जिल्ह्याचे प्रमुख केंद्र असून, पुणे विभागात उत्पन्न मिळवून देण्यात सांगलीचे स्थानक आघाडीवर आहे. तरीही सांगलीच्या प्रवाशांचा विचार गाड्यांना थांबा देताना केला जात नाही. त्यामुळे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.देशभरात धावणाऱ्या १० संपर्कक्रांती गाड्यांना एकाच राज्यात दोनपेक्षा अधिक थांबे आहेत तर काही संपर्कक्रांती गाड्यांना तर एकाच राज्यात ४, ५, ६ व ८ थांबे आहेत. मग सांगलीतच संपर्कक्रांतीला थांबा का नाही? हा प्रश्न अनेक प्रवासी विचारत आहेत.

थांब्याचा नियम शिथिलसंपर्कक्रांती रेल्वे गाड्यांना स्वतःचे राज्य वगळून इतर राज्यांमध्ये फक्त दोनच थांबे देता येतात, असा नियम पूर्वी होता. परंतु, हा नियम शिथिल करून रेल्वे बोर्डाने अनेक राज्यांमध्ये दोनपेक्षा अधिक थांबे दिले आहेत.

प्रवासी संघटनांची मागणी दुर्लक्षितसांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप, इतर प्रवासी संघटना, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स व नागरी जागृती मंचनेही संपर्कक्रांतीला सांगलीत थांबा देण्याची मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

सांगली शहराला विमानतळ नाही. राष्ट्रीय महामार्ग सांगली शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. फक्त सांगली रेल्वे स्थानक हे शहराच्या मध्यभागात सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीशेजारी असल्याने संपर्कक्रांतीला सांगली शहरात थांबा दिल्यास सांगलीत येणाऱ्या-जाणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांची खूप मोठी सोय होणार आहे. - रोहित गोडबोले, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

संपर्कक्रांतीला थांबे, कंसात थांबे दिलेले राज्यरेल्वेचे नाव    -      थांबेबिहार संपर्कक्रांती - ६ (उत्तर प्रदेश)आंध्र संपर्कक्रांती - ८ (तेलंगणा)छत्तीसगढ संपर्कक्रांती - ५ (मध्य प्रदेश)उत्तर संपर्कक्रांती - ५ (पंजाब)गोवा संपर्कक्रांती - ४ (महाराष्ट्र)कर्नाटक संपर्कक्रांती - ४ (महाराष्ट्र)पश्चिम बंगाल संपर्कक्रांती - ३ (उत्तर प्रदेश)पूर्वोत्तर संपर्कक्रांती - ३ (उत्तर प्रदेश)केरळ संपर्कक्रांती - ३ (महाराष्ट्र)

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे