शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

चांदोली धरण परिसरात संततधार सुरूच

By admin | Published: June 22, 2015 11:59 PM

जिल्ह्यात पावसाची उसंत : धरण पाणीसाठ्यात ०.६८ टीएमसीने वाढ

वारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, मागील २४ तासांत १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाची पातळी एक मीटरने वाढली आहे. धरणाची पाणीपातळी ६०९.५० मीटर म्हणजेच १९.३६ टीएमसी झाली आहे. एकूण पाऊस ४४० मिलिमीटर झाला आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३१७.६७ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातून धरणात पाणी येत आहे. डोंगर-दऱ्यातून मोठ्याप्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे धबधबे कोसळू लागले आहेत. धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ०.९५ मीटरने पाणी पातळी वाढली आहे. सोनवडे, मणदूर, आरळा, गुढेतील ऊस व भात शेतीत पाणी साचले आहे. तीन दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने हा परिसर अंधारात असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. वारणा नदी दुथडी भरून वहात आहे. शिराळा : शिराळा तालुक्यात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली. मात्र सोमवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. लहान-मोठ्या काही पावसाच्या सरी आज पडत होत्या.गेले दोन दिवस मान्सूनने तालुक्यात चांगली हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे. गेल्या चोवीस तासात शिराळा, कोकरूड, चरण, मांगले, सागाव, चांदोली धरण या भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणातील पाणीपातळीत ०.६८ टीएमसीने वाढ झाली आहे. धरण पातळी ६०९. ५० मी., पाणीसाठा ५४८.३८ द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा ३५३.५४ आहे. धरणात १२.३६ पाणीसाठा असून, ५६.२९ टक्के धरण भरले आहे. वीज निर्मिती केंद्रातून ५४२ क्युसेकने पाणी विसर्ग चालू आहे. (वार्ताहर)शिराळ्यातील पाऊसगेल्या चोवीस तासात मंडलनिहाय पडलेला पाऊस व कंसात एकूण पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे- शिराळा ६६ (१८६), शिरशी ३१ (९७), कोकरूड ९० (२४०), चरण ६५ (२१९), मांगले ७८ (२२९), सागाव ६५ (२१५), चांदोली धरण १७० (४४०)