शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, अतुल भोसले यांची विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 7:09 PM

विधानपरिषदेवर डॉ. अतुल भोसले व सम्राट महाडिक यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण

अशोक पाटीलइस्लामपूर : भाजपच्या कोट्यातून २०१६ मध्ये विधानपरिषदेवर गेलेल्या आमदारांची मुदत यंदा संपली. आता त्या १० जागांसाठी निवडणूक होत असून, डॉ. अतुल भोसले व सम्राट महाडिक यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्याचवेळी इस्लामपूरचे मावळते नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. विधानसभेवेळी अतुल भोसले दक्षिण कऱ्हाडमधून भाजपच्या उमेदवारीवर, तर सम्राट महाडिक शिराळा मतदारसंघात व निशिकांत पाटील इस्लामपुरातून बंडखोरी करून लढले होते. भाजपच्या कोट्यातून २०१६ मध्ये सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले,  राज्यमंत्रीपदही देण्यात आले. त्यानंतर त्यांनी रयत क्रांती शेतकरी संघटना स्थापन केली. मात्र २०१९ मध्ये राज्यात भाजपविरोधातील सरकार सत्तेवर आले. आता खोत यांना भाजपमधून विधानपरिषदेवर संधी मिळणे दुरापास्त आहे. त्यांनी पुन्हा आमदारपद मिळण्यासाठी शरद पवारांसह महाआघाडी सरकारला लक्ष्य केले आहे.इस्लामपूरचे मावळते नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. त्यांनी इस्लामपुरातून शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकल्याने ते चर्चेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी फिल्डिंग लावल्याचे समजते.गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी कऱ्हाडमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात भाजपची बांधणी केली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात त्यांनी खिंड लढवली आहे. त्यामुळे विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भोसले ही निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. विधानसभा निवडणुकीत शिराळ्यात सम्राट महाडीक यांची बंडखोरी भाजपच्या शिवाजीराव नाईक यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली.महाडीक यांना मिळालेल्या ५० हजार मतांचा विचार करूनच महाडीक बंधूंना भाजपने पक्षात घेतले. जिल्हा बँक निवडणुकीत राहुल महाडीक यांनी विरोध असतानाही बाजी मारली. शिराळा मतदारसंघ वाळवा तालुक्याशी निगडित असल्याने भाजपने महाडीक बंधूंना ताकद देण्याचे निश्चित केले आहे. त्यातून विधान परिषदेसाठी सम्राट महाडीक यांचे नाव पुढे आले आहे.

अतुल भोसलेंचे लक्ष्य विधानसभा निवडणूकडॉ. अतुल भोसले मुंबईत आहेत. त्यांचे लक्ष्य २०२४ ची विधानसभा आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाVidhan Parishadविधान परिषद