सांगली : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदींचे २६ मे २०१४ रोजी झालेले शपथग्रहण म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. त्यानुसार निषेध म्हणून बुधवारी (दि.२६) जिल्हाभरात मोर्चातर्फे घरांघरांवर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावले.मोर्चाच्या चलो दिल्ली किसान आंदोलनालाही आजच सहा महिने पूर्ण झाले. शिवाय, ३० मे २०१९ रोजी मोदी यांनी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. केंद्रीय कामगार संघटनांच्या देशव्यापी संपालाही सहा महिने पूर्ण झाले. याचे निषेध करत मोर्चाने काळा दिवस पाळला.मोर्चाने भूमिका स्पष्ट केली की, गेली सात वर्षे सत्तेतील मोदी सरकारने मोठ्या आश्वासनांपैकी एकही पाळले नाही. कष्टकऱ्यांच्या इच्छा, आकांक्षांच्या विरोधात बेदरकार वागत आहे. लोकसभेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेजबाबदारपणामुळे हजारो लोकांचे जीव जात आहेत.महामारीशी दोन हात करण्याची जबाबदारी झटकून संपूर्ण ओझे राज्यांच्या खांद्यावर टाकले आहे. लसींच्या मात्रा, ऑक्सिजन, रुग्णालयांतील खाटा, मृतांचे अंत्यसंस्कार या सर्वच बाबतीत धोकादायक स्थिती आहे. संकटकाळाला तोंड देण्याविषयी अनभिज्ञताच सिद्ध झाली आहे.भांडवलदारांच्या फायद्यासाठी बनवलेले कायदे मंजूर करवून घेण्यासाठीच महामारीचा उपयोग मोदी सरकार करुन घेत आहे. असंघटित कामगार, स्थलांतरीतांना या काळात धान्य, रोख रक्कम आणि रोजगाराची गरज आहे. पण मदतीच्या आघाडीवर सरकारला लकवा झाला आहे.कोविडसाठी निधी नसताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी मात्र २० हजार कोटींची उधळपट्टी सुरु आहे. सीबीआय, ईडी, एनआयए, सर्वोच्च न्यायालय, आरबीआय, निवडणूक आयोग, राज्यपाल या घटनात्मक संस्था विरोधकांना नमवण्यासाठी वापरल्या जात आहेत. या सर्वाच्या निषेध म्हणून बुधवारी काळा दिवस पाळण्यात आला. जिल्ह्यात उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, रेहाना शेख, तुळशीराम गळवे, हणमंत कोळी, वसंत कदम, गुलाब मुलाणी, मीना कोळी आदींनी आंदोलनाचे नियोजन केले.
मोदींच्या शपथग्रहण दिनी निषेध, संयुक्त किसान मोर्चाने पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:30 IST
Morcha Sangli : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदींचे २६ मे २०१४ रोजी झालेले शपथग्रहण म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवारी (दि.२६) जिल्हाभरात मोर्चातर्फे घरांघरांवर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावले.
मोदींच्या शपथग्रहण दिनी निषेध, संयुक्त किसान मोर्चाने पाळला काळा दिवस
ठळक मुद्देमोदींच्या शपथग्रहण दिनी निषेध, संयुक्त किसान मोर्चाने पाळला काळा दिवससंयुक्त किसान मोर्चातर्फे फडकावले घराघरावर काळे झेंडे