मोहन मोहितेवांगी : कडेगाव तालुक्यातील वांगी, शेळकबाव येथे येरळा नदीपात्रातून बेसुमार वाळूचोरी सुरू आहे. वाळू तस्करीमुळे नदीपात्र उघडे पडले आहे. वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने नदीत उतरणाऱ्या सर्व रस्त्यांवर चरी काढलेल्या होत्या. मात्र, प्रशासन निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याचा फायदा घेऊन वाळू तस्करी सुरू केली आहे.नदीपात्रात रात्रभर धडधडणारे जेसीबी, वस्त्यांवरील रस्त्यांची दुर्दशा करीत जाणाऱ्या अवजड वाहनांनी लोकांची झोप उडवली आहे. रोज शेकडो ब्रास वाळू वांगी, शेळकबाव येथून जेसीबीच्या साहाय्याने डंपर व ट्रॅक्टर, टेपो व बैलगाडीतून पळवली जात आहे. नियुक्त गस्ती पथके इकडे फिरकत नाहीत की तस्करांची वाहनेच त्यांना दिसत नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.वाळूची चोरी नियुक्ती केलेल्या गस्त पथकाने रोखावी, तसेच या वाळू चोरीप्रकरणी प्रांताधिकारी व तहसीलदारांंनी स्वतः लक्ष घालून या परिसरात सुरुवात असणारी वाळूचोरी रोखून वाळू माफियांवर कडक कारवाई करावी मागणी शेतकऱ्यांतून होते आहे.वाळू माफिया मालामालवांगी नदीपात्रात वाळू तस्करी करण्यासाठी परगावहून वाळू तस्कर येत असून ते डंपरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करीत असल्यामुळे ते मालामाल झाले आहेत. याकडे महसुलचे अधिकारी लक्ष कधी देणार, अशीही चर्चा आहे.शेतकरी वैतागलेनदीपात्रात वाळूचोरी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जॅकवेल व रिगा उघड्या पडत आहेत. त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडत आहे. शेतकऱ्यांनी तक्रार करीत आहेत. मात्र, कारवाई होत नसल्याने ते वैतागले आहेत.
सांगलीतील वांगी येथे येरळा पात्रातून वाळू तस्करी, अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 5:25 PM