शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

वाळू चोरीचा अजब फंडा

By admin | Published: March 11, 2016 11:21 PM

तासगावात प्रशासनाकडून भांडाफोड : वाळू ट्रकवर दगडी चुऱ्याचा थर; ट्रक जप्त

तासगाव : बेकायदा वाळू वाहतुकीबाबत तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले आणि त्यांच्या टीमने तालुक्यात धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे तालुक्यात सहजासहजी बेकायदा वाळू वाहतूक होत नाही. मात्र शुक्रवारी अजब फंडा वापरुन होणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीचा भांडाफोड झाला. वाळूने भरलेल्या ट्रकमध्ये वाळूच्या वरील बाजूस दगडी चुऱ्याचा थर देऊन या चुऱ्याची वाहतूक होत असल्याचे भासवण्यात येत होते. या ट्रकचा भांडाफोड प्रशासनाकडून केला.शुक्रवारी सकाळी दहा वाजता पलूसहून तासगावच्या दिशेने पोपट जमदाडे (पलूस) यांचा डम्पर (क्र. एमएच १० एमएच ५२४४) जात होता. या डम्परच्या वाहतुकीबाबत संशय आल्यानंतर अव्वल कारकुन सुनील चव्हाण यांनी डम्पर चालकास विचारणा केली. डम्परमधून स्टोन क्रेशरवरील दगडी चुऱ्याची वाहतूक केली जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र शंका आल्याने डम्पर थांबवून तपासणी करण्यात आली. डम्परच्या वरील बाजूचा दगडी चुऱ्याचा थरा बाजूला सारला असता, खालील बाजूस वाळू असल्याचे निदर्शनास आले. या आठवड्यात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या पाच जणांना सहा लाख एक हजार ७४० रुपयांचा दंड आकारल्याची माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली. (वार्ताहर)पावतीही बोगसडम्परधारकाकडे असलेली वाहतुकीची पावती बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा डम्पर जप्त करुन ८१ हजार ३९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अव्वल कारकुन सुनील चव्हाण, मंडल अधिकारी ओमासे, तलाठी कीर्तीकुमार धस, दीपक वायदंडे, आर. एच. पवार, टी. एस. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.