लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे संदीप निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच सागर चव्हाण यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे निकम यांची बिनविरोध निवड झाली.
कसबे डिग्रजच्या विकासासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून गावातील प्रमुख समस्या सोडविण्यावर भर देणार आहे. वाॅर्डातील विस्तारित गुंठेवारी भागातील प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी काम करणार आहे. रस्ते, वीज, पाणी यासह क्रीडांगण, व्यापारी संकुल व अंतर्गत पाईपलाईन या प्रमुख विकासकामांच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर उपसरपंच संदीप निकम यांनी दिली.
यावेळी विविध संस्था, व्यक्ती, गणेश व क्रीडा मंडळे यांनी सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एम. आर. सरगर यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
100821\img-20210810-wa0005.jpg
संदीप निकम