शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

शासकीय कर्मचाऱ्यांचा सांगलीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:10 AM

लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, तसेच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषदेच्यावतीने मंगळवारी

ठळक मुद्दे: सहाव्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासह जुन्या पेन्शनचा लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सांगली : लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, तसेच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद, सांगली पाटबंधारे मंडळासह सर्वच विभागातील जिल्ह्यातील लिपिक रजा काढून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

परिषदेचे अध्यक्ष राजाराम चोपडे, सुशांत कांबळे, शैलेंद्र गोंधळे, संभाजी कोळी, संजय मदने, नानासाहेब हाक्के, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक शंकर वडाम, गणेश जोशी, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष स्वप्नाली माने, विनायक जाधव, विशाल पाटील, बी. एस. पाटील, संतोष सदामते, स्वप्नील भांबुरे, अशोक लोहार यांच्यासह सर्व शासकीय विभागातील लिपिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

लिपिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी यापूर्वी परिषदेच्यावतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन, एल्गार परिषद, मोर्चा आदी आंदोलने करण्यात आली होती. मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. सांगली-मिरज रस्त्यावरुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे शासन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. लिपिकांना समान कामास समान वेतन द्यावे, समान पदोन्नतीचे टप्पे करावेत आणि मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करावे, जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी, बक्षी समितीच्या शिफारशीनुसार लिपिकास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दहा, वीस आणि तीस या टप्प्यात द्यावा, पदोन्नतीधारक लिपिक संवर्गीय कर्मचाºयास वरिष्ठ पदाच्या किमान मूळ वेतनासाठी २२ एप्रिल २००९ च्या अधिसूचनेत सुधारणा करावी, लिपिकांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकण्यात यावी, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.प्रथमच सर्व लिपिक एका झेंड्याखालीजिल्हा परिषद, महसूल आणि पाटबंधारेसह अन्य विभागातील लिपिकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. एकाच मागणीवर या सर्व कर्मचारी संघटनांची वेगवेगळी आंदोलने गेल्या अनेक वर्षापासून चालू होती. पण शासनाकडून कधीच दखल घेतली नव्हती. म्हणूनच सर्वच विभागातील लिपिकांनी एकत्रित येत प्रथमच ‘महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषद’ या संघटनेची स्थापना करुन मंगळवारी लिपिकांनी आपल्या एकजुटीचे शक्तिप्रदर्शन दाखविले. या रेट्यामुळे निश्चित प्रश्न सुटतील, असा विश्वास प्रत्येक कर्मचाºयाच्या चेहºयावर होता. यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सागर बाबर आणि पाटबंधारे विभागाचे राजाराम चोपडे यांनी पुढाकार घेतला होता.सांगलीत मंगळवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप