शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

सांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, धीरज सूर्यवंशी उपमहापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:26 PM

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली.

ठळक मुद्देसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, धीरज सूर्यवंशी उपमहापौरविशेष सभेत निवड, वाजपेयी यांना श्रध्दांजली

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणून संगीता खोत यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवड झाली. अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहेसकाळी साडे अकरा वाजता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहून महापौर निवडीच्या विशेष सभेचे कामकाज सुरु झाले.

धीरज सूर्यवंशी उपमहापौर

विशेष सभा सुरू होण्यापूर्वी गोव्याला गेलेल्या नगरसेवकांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने निषेध केला. महानगरपालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर भाजपच्या पहिल्याच महापौरपदाचा मान संगीता खोत यांना आणि उपहमहापौरपदाचा मान धीरज सूर्यवंशी यांना मिळाला. अटलजींच्या निधनामुळे साध्या पध्दतीने ही निवडप्रक्रिया पूर्ण करण्यात आली.नव्या सभागृहात भाजपचे ४१ नगरसेवक असून अपक्ष गजानन मगदूम यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ३५ नगरसेवक आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक गोव्याला सहलीसाठी गेले होते. सर्व पक्षांनी नगरसेवकांना व्हीप लागू केले होते.भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खोत आणि उपमहापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसकडून वर्षा अमर निंबाळकर यांनी महापौरपदासाठी तर स्वाती पारधी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते.

स्वाती मदने यांनी महापौरपदासाठी दाखल केलेला अर्ज सकाळी मागे घेतल्यानंतर संगीता खोत आणि वर्षा निंबाळकर यांच्यासाठी मतदान सुरु झाले. त्यात संगीता खोत ४२ मतांनी विजयी झाल्या. उपमहापौरपदासाठीही धुरज सूर्यवंशी यांना ४२ आणि स्वाती पारधी यांना ३५ मते मिळाली. विजय घाडगे तटस्थ राहिले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूक