ठळक मुद्दे...तर सांगली बंद करणार!कायदा मोडणाऱ्यांची गय नाही : शर्मापोलिसप्रमुख शर्मा यांची भिडे गुरुजींसोबत चर्चाप्रकाश आंबेडकरांचा निषेध, दुकाने पटापट बंद
सांगली : बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने गुरुवारी पोलिस व प्रशासनाला दिला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना अडविण्यात आले आहे, असा आरोपही शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला.बुधवारी सांगली बंदवेळी मारुती चौकात संभाजीराव भिडे यांचे पोस्टर फाडण्यात आले होते. या पार्श्वभूमिवर शिवप्रतिष्ठानने गुरुवारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बोलत होते. मारुती चौकातून मोर्चास प्रारंभ झाला.
मारुती रस्ता, हरभट रस्ता, शहर पोलिस ठाणे, राजवाडा चौक या मार्गावरुन घोषणाबाजी करीत हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. याठिकाणी जिल्हाधिकारी विजय काळम, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे हेही दाखल झाले. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले म्हणाले, गुरुजींनी आपल्याला शिस्त घालून दिली आहे. त्याचे प्रत्येक कार्यकर्त्याने पालक करावे. कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेवेळी गुरुजी तिथे गेलेही नव्हते. प्रकाश आंबेडकरांनी जाणीवर्पूक त्यांचे नाव घेतले.
गुरुजी सांगलीतच होते. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्रींच्या रक्षाविसर्जला गुरुजी दिवसभर तिथे होते. आमच्याकडे पुरावेही आहेत. त्यांच्याविरुद्ध महिलेने दिलेली फिर्याद खोटी आहे. काही संघटना हिंदू धर्मात फूट पाडून दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचा हा मोर्चा कुठल्या समाजाविरुद्ध नाही.
शिवप्रतिष्ठानने कधीही जातीपातीचे राजकरण केले नाही. बुधवारच्या बंदमध्ये सर्वांनी उर्त्स्फूपणे सहभाग घेतला होता. पण समाजकंटकांनी जाणीवर्पूक तोडफोड करुन लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केले. यामध्ये एमआयएमचे कार्यकर्तेही घुसले होते.
...तर सांगली बंद करणार!नितीन चौगुले म्हणाले, बंदच्या नावाखाली शहरात दगडफेक करुन तोडफोड करणाऱ्यांची नावे निष्पन्न करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. यासाठी सीसीटीव्ही फुटेज व व्हिडीओची मदत घ्यावी. तोडफोडीत जे काही नुकसान झाले आहे, ते संबंधितांकडून वसूल करावे. पोलिस व प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही, तर आम्हालाही रस्त्यावर उतरुन सांगली बंद करावी लागेल.कायदा मोडणाऱ्यांची गय नाही : शर्माजिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा म्हणाले, बंदवेळी तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तपास सुरु असल्याने आणखी गुन्हे दाखल होतील. तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तैनात केले आहे. ज्यांनी कायदा मोडला आहे, त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे. पोलिस तुमच्यासोबत आहेत. कुठेही अनुचित प्रकार होऊ देणार नाही.
जिल्हाधिकारी विजय काळम म्हणाले, कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल. समाजाच्या संपत्तीचे नुकसान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिस व प्रशासन गप्प बसणार नाही. भिडे गुरुजींना मी जवळून पाहिले आहे. शिवप्रतिष्ठानने आज ज्या काही मागण्या व भावना व्यक्त केल्या आहेत, त्या शासनाला कळविल्या जातील.गुरुजींची भेटसंभाजीराव भिडे (गुरुजी) मोर्चातील सभेत मध्यभागी बसले होते. जिल्हाधिकारी विजय काळम यांचे त्यांच्याकडे लक्ष जाताच त्यांनी गुरुजींना बोलावून घेतले. अल्पबचत सभागृहात काळम, पोलिसप्रमुख शर्मा यांनी भिडे गुरुजींसोबत चर्चा केली. काळम यांनी जे काही सत्य आहे, ते बाहेर येईल. योग्य ती कारवाई होईल, असे गुरुजींना सांगितले. यावेळी नितीन चौगुले उपस्थित होते.प्रकाश आंबेडकरांचा निषेधशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सकाळी दहापासून मारुती चौकात जमा झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. मारुती चौक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबजी करुन परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचा निषेध करुन त्यांच्यावर कारवाई मागणी करण्यात आली.दुकाने पटापट बंदशिवप्रतिष्ठानचा मोर्चा पाहून मार्गावरील दुकाने पटापट बंद होऊ लागली. पण कार्यकर्त्यांनी दुकान उघडण्यास सांगितले. तरीही काही व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवली होती. मोर्चाच्या मार्गावर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चाच्या चारही बाजूला शस्त्रधारी पोलिस होते. मोर्चामागे तीन मोठ्या पोलिस व्हॅन होत्या. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे मोर्चामागे होते.शिवप्रतिष्ठानचे निवेदनशिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा काढून टाकावा. बंदच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्यांना अटक करावी. या सर्वांमागे भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, कबीर कला मंच, बामसेभ यांच्यासहित इतर सहभागी संघटनांची चौकशी करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, नितीन चौगुले, बजरंग पाटील, सतीश खांबे, सुब्राव