शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद, शिवप्रतिष्ठानच्या मोर्चामुळे सांगलीत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 4:06 AM

शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी सलग दुसºया दिवशीही सांगतील तणावग्रस्त परिस्थिती होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा काढून टाकावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

सांगली  - शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी सलग दुसºया दिवशीही सांगतील तणावग्रस्त परिस्थिती होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा काढून टाकावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.‘बंद’च्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाºयांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करू, असा इशाराही देण्यात आला.बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’वेळी येथील मारुती चौकात भिडे यांचे पोस्टर फाडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानने गुरुवारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मारुती चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मारुती रस्ता, हरभट रस्ता, शहर पोलिस ठाणे, राजवाडा चौक या मार्गावरुन घोषणाबाजी करीत हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहैल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे हेही दाखल झाले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा काढून टाकावा. बंदच्या नावाखाली हुल्लडबाजी करणा-यांना अटक करावी. या सर्वांमागे भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, कबीर कला मंच, बामसेफ यांच्यासह इतर सहभागी संघटनांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.शिवप्रतिष्ठानचा मोर्चा पाहून मार्गावरील दुकाने पटापट बंद होऊ लागली, पण कार्यकर्त्यांनी दुकाने उघडण्यास सांगितले. तरीही काही व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली होती.नगरमध्ये आज दलित संघटनांचा मोर्चा अहमदनगर : कोरेगाव-भीमा घटनेतील दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी फुले, शाहू, आंबेडकर, परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे़ मोर्चात शहरासह जिल्ह्यातून भीमसैनिक उपस्थित राहतील ,अशी माहिती सुनील क्षेत्रे व अजय साळवे यांनी गुरुवारी येथे दिली़नगर-पुणे रोडवरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभा घेऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जाणार असल्याचे साळवे म्हणाले़प्रकाश आंबेडकरांचा निषेधशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सकाळी दहापासून मारुती चौकात जमा झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. मारुती चौक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.एकबोटे, भिडेंविरोधात औरंगाबादेत गुन्हाऔरंगाबाद : कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी औरंगाबादेतून गेलेल्या पथकावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे, मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, अनिल दवे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात दंगल करणे, मारहाण करणे, कारचे नुकसान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे ग्रामीणमधील शिक्रापूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. छावणी पोलिसांनी सांगितले की, भावसिंगपुरा परिसरातील पेठेनगर येथील रहिवासी जयश्री सुदाम इंगळे या अन्य काही सहकाºयांसह १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या.राहुल फटांगडेच्या कुटुंबाला २५ लाख द्याऔरंगाबाद : कोरेगाव भीमा येथील दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एक जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, भीमा- कोरेगाव घटनेचा मराठा क्र ांती मोर्चाने जाहीर निषेध नोंदविला आहे. या घटनेला भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. असे असताना मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावतीचे भाजप आमदार अनिल बोंडे यांनी या घटनेमागे मराठा क्रांती मोर्चा असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून, दोन समाजात तेढ निर्माण करणाºया आमदार बोंडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी मोर्चा करीत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ५८ मोर्चे काढले. आमचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नव्हते, हे मागासवर्गीय समाजाला माहीत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दलित वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत.कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेवेळी भिडे गुरुजी तिथे गेलेही नव्हते. प्रकाश आंबेडकरांनी जाणीवपूर्वक त्यांचे नाव घेतले. गुरुजी सांगलीतच होते. त्यांच्याविरुद्ध महिलेने दिलेली फिर्याद खोटी असून गुन्हा काढून टाकावा.- नितीन चौगुले, कार्यवाह, शिवप्रतिष्ठान

टॅग्स :SangliसांगलीBhima-koregaonभीमा-कोरेगाव