सांगली : आपल्या खुमासदार, विनोदी ढंगाच्या आणि अस्सल गावरान शब्दातील भाषणबाजीने शनिवारी पतंगराव कदम यांनी सांगलीकरांना मनमुराद हसविले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्व नेत्यांची फिरकी घेत त्यांनी धुवॉँधार फटकेबाजी केल्याने मदनभाऊ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ््याच्या अनावरण सोहळ््यात हास्यकारंजे फुलले होते.
पतंगरावांनी शुक्रवारी कोल्हापुरातही अशीच विनोदी ढंगातील भाषणबाजी करीत अनेक नेत्यांच्या अडचणीचे विषयसुद्धा मांडले होते. त्यामुळे माजी मंत्री सतेज पाटील यांनी पतंगरावांना भाषणापूर्वीच अडचणीचे मुद्दे काढू नयेत, अशी विनंती केली होती. कोणाच्या विनंतीने थांबतील ते पतंगराव कसले. त्यांनी स्वभावाप्रमाणे सतेज पाटलांची विनंतीही सर्वांसमोर उघड केली आणि चिमटे काढण्यास सुरुवात केली. मदन पाटील यांच्या तिकिटाचा किस्सा त्यांनी यावेळी ऐकवला. आनंदराव मोहितेंचे विधानसभेचे तिकीट मी फायनल केले होते.
प्रकाशबापूंनी ऐनवेळी मदन पाटील यांचे नाव घुसविले. तरीही आम्ही ते खिलाडूवृत्तीने मान्य केले, मात्र हाफिज धत्तुरेंचे प्रकरण सगळ््यात वेगळे निघाले. ऐनवेळी आम्ही फायनल केलेल्या यादीत मिरजेचे नाव बदलून धत्तुरेंचे आले. आता हा धत्तुरे कोण, असा प्रश्न आम्हाला पडला. अभिनेते दिलीपकुमार यांनी त्यांचे नाव सुचविले होते. म्हणूनच धत्तुरेंसारखा नशिबवान आमदार दुसरा कोणीच नाही. दुसºयावेळी त्यांचे नाव काढले होते, नंतर मीच त्यांचे नाव यादीत घ्यायला लावले. त्यामुळे ते दुसºयांदाही नशिबवान ठरले.
मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर मदनचे नाव अपक्षांच्या गटातून निश्चित करून अशोक चव्हाणांनी चांगले काम केले. अशोक माझा मित्र आहे. तो चांगली कामे करीत असतो, पण अधुनमधून काही घोटाळेही करतो. पतंगरावांच्या या वाक्यावर उपस्थितांत जोरदार हशा पिकला. मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतरही मदनसमोर अनेक अडचणी आल्या. सरकार कोणतेही असले, तरी त्याठिकाणीमंत्र्यांची एक टोळी कार्यरत असते.
या टोळीतल्या एकाने मदनकडील पणन खाते काढून आपल्याला मिळावे म्हणून जोरदार फिल्डिंग लावली होती. मदनचा मला फोन आला आणि ही भानगड सांगितली. मी लगेच त्याला सांगितले, काहीही होऊ दे, हे खाते तू सोडू नको, तुझ्या आवडीचेच खाते आहे. त्यामुळे त्याचे खाते तरले. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर जो येईल त्याची कामे करण्याचे धोरण नेहमीचस्वीकारले. एकदा तर वसंतदादा कारखान्याच्या सोनीच्या शाखेसाठी ९ कोटी रुपये दिले होते. त्या सोनी कारखान्याचे काय झाले, देव जाणे.
प्रकाशआण्णा आवडेकडे पहात ते म्हणाले, राजकारणात सुरुवातीला आमच्याकडे काहीच नव्हते. दिल्लीत वजन न वापरताच तीनवेळा तिकिट आणले आणि मंत्रीपदही मिळविले. प्रकाशचे बरे होते, त्याच्याकडे बक्कळ माल पण होता आणि सगळंच होतं. मदन पाटील यांच्याबद्दल ते म्हणाले की, हा माणूस अजब होता. मदन पाटीलसारखा दिलदार मित्र नाही, पण त्याच्यासारखा शत्रूही नाही. त्याचे शत्रुत्व कोणालाही परवडणारे नव्हते.
एकदा तर या पठ्ठ्याने जिल्ह्यातले सगळे आमदार निवडणुकीत पाडले. सगळ््या राज्यात चर्चा झाली. मलाही अनेकजण यावरून चिमटे काढत होते. लोकांना सांभाळायचे कसे हे त्याच्याइतके कोणाला कळाले नाही. म्हणूनच त्याच्या पश्चात दोन वर्षानंतरही त्याचे कार्यकर्ते अजूनही त्याच्यावर प्रेम करताना दिसतात. हल्लीच्या राजकारणात निष्ठा कुठे पहायलाच मिळत नाही. आज हा तिकडे जातो, तो इकडे येतो. संजयसुद्धघ आमचाच माणूस होता. तशी बरीच मंडळी आमची होती. आता दुसरीकडे गेली आहेत.तू ढोंगी बाबांच्या नादी लागू नको!संजकाका पाटील यांचीही पतंगरावांनी फिरकी घेतली. संजय तसा चांगला आहे, पण हा बाबांच्या नादी फार लागतो. तसं काही करू नको, हे बाबा फार ढोंगी असतात. एकदा हा असाच कोणत्या तरी महाराजकडे गेला होता आणि नंतर खासदार म्हणूनच माझ्यासमोर आला. पतंगरावांच्या या वाक्यावर उपस्थितांसह व्यासपीठावरील नेतेमंडळीही हशा पिकला.चव्हाण आमच्या कुंडलीतच...
केव्हा बघेल तेव्हा हे चव्हाण आमच्या कुंडलीत बसलेलेच आहेत. शंकरराव चव्हाणांपासून अशोक चव्हाणांपर्यंत जेवढे म्हणून आले ते कुंडलीतच होते.
पतंगरावांच्या या वाक्यावर हशा पिकलासगळ््यांनी खावूनही ३५ कोटी उरले चिमटे काढता काढता पतंगरावांनी त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्यासध्याच्या सांगली मार्केट यार्डाचा विषयसुद्धा सोडला नाही. ते म्हणाले, वसंतदादांचे कामच मोठे होते. त्यांनी सांगलीत एवढी मोठी मार्केट कमिटी काढली की, येईल त्या सगळ््यांनी खाल्ले, तरीही ३५ कोटी उरले होते.मंत्री असूनही महापालिकेतील टक्केवारी कळली नाही!
पतंगराव म्हणाले की, जयश्रीताई पाटील यांना महापालिका क्षेत्रासाठी आम्ही ताकद देऊ. मदनभाऊंप्रमाणे निर्णयाचे सर्व अधिकारही त्यांच्याकडे राहतील, पण आम्हाला चिंता महापालिकेतल्या लोकांची आहे. याठिकाणी अनेक टगे आहेत. ते नेहमी टक्केवारीचा खेळ खेळतात. वीस वर्षे मंत्रीपदावर राहिलो तरीही मला महापालिकेतली ही टक्केवारी काही कळली नाही. त्यामुळे जयश्रीतार्इंना सावधपणे पावले उचलावी लागतील.