सांगलीत कॉँग्रेसचा मूक मोर्चा, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:12 AM2018-05-27T01:12:09+5:302018-05-27T01:12:09+5:30

केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून सांगली शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.

The Sanghit Congress's Silent Morcha, Opposition: Prohibition of Central Government Policies | सांगलीत कॉँग्रेसचा मूक मोर्चा, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध

सांगलीत कॉँग्रेसचा मूक मोर्चा, निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध

Next
ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाळला ‘विश्वासघात दिन’

सांगली : केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून सांगली शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत म्हणून कार्यकर्त्यांनी ‘विश्वासघात दिन’ पाळला.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. मारुती रोड, हरभट रोड, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला. मूक मोर्चा संपल्यानंतर स्टेशन चौकात पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपने देशभरातील जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आम्ही आजचा दिवस विश्वासघात दिन म्हणून पाळला आहे. निवडणुकीपूर्वी अनेकप्रकारची आश्वासने या सरकारने जनतेला दिली होती,

मात्र सत्ता मिळाल्यावर त्यांना याचा विसर पडला. गेल्या चार वर्षात केंद्र सरकार महागाई कमी करण्यात, बेरोजगारांना रोजगार देण्यात अपयशी ठरले. इंधन दरवाढीने तर सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारने केले. जनतेच्या हिताचे एकही धोरण सरकारने राबविले नाही.
मोर्चात जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, दिलीप पाटील, शेवंता वाघमारे, राजन पिराळे, बिपीन कदम, मदनभाऊ युवा मंचचे अमोल झांबरे, प्रकाश मुळके, संजय पवार, अमित पारेकर, कय्युम पटवेगार, रवींद्र खराडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या अपयशी कारभाराचा निषेध व्यक्त करीत कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने शनिवारी सांगलीत जोरदार निदर्शने करण्यात आली.येथील कॉँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्यात आले. महिला कॉँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘जगण्यासाठी भाषण नाही, राशन द्या’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके, वर पाय’ अशा घोषणा देत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी शैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. रेशनिंगपासून रोजगारापर्यंत सर्व स्तरावर सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला यांच्यावर अन्यायाचे धोरण सरकार राबविताना दिसत आहे.
आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वहिदा नायकवडी, राजश्री मालवणकर, नगरसेविका अश्विनी कांबळे, सुजाता हुद्दार, श्वेता शेठ, बेबी शेख, शमशाद नायकवडी, सुलोचना माने, रजिया अन्सारी आदी सहभागी झाल्या होत्या.

डिस्ट्रॉय इन इंडिया : पृथ्वीराज पाटील
पृथ्वीराज पाटील म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. व्यापार, उद्योग मंदीत गेला. नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाचा आर्थिक विकास दर खालावला. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. शासनाची ‘मेक इन इंडिया’ योजना फेल गेली असून, ती आता ‘डिस्ट्रॉय इन इंडिया’ अशी बनली आहे. गेल्या चार वर्षात सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.
 

महिलांवरील अत्याचार वाढले : शैलजाभाभी पाटील
शैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना या सरकारच्या काळात वाढल्या आहेत. अत्याचार करणाºया नराधमांना अटक करून त्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारचे कोणतेही प्रयत्न दिसत नाहीत. असे नराधम खुलेआम फिरत आहेत. त्यांना सरकारचे अभय मिळत असल्याचा संशय वाटत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांप्रमाणेच समाजातील एकही घटक आज या भाजप सरकारच्या काळात सुखी दिसत नाही. त्यामुळे आम्ही अशा अपयशी सरकारचा निषेध करीत आहोत.

Web Title: The Sanghit Congress's Silent Morcha, Opposition: Prohibition of Central Government Policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.