- अशोक डोंबाळे सांगली : डिसेंबर २०२२ महिन्यात जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींमध्ये १० हजार १७० उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. यापैकी आठ हजार ५०२ उमेदवारांनी खर्च सादर केला आहे. पण, एक हजार ६६८ उमेदवारांनी मुदतीमध्ये खर्चाचा हिशेब सादर केला नाही. या उमेदवारांवर दोन दिवसांत अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ब) (१) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशेब मुदतीत सादर न केल्याने उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या जिल्ह्यातील एकूण एक हजार ६६८ उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब दि. २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च न देणाऱ्यांचे पद धोक्याततालुका एकूण उमेदवार खर्च दिलेले खर्च न देणारेमिरज १०५९ ९७२ ८७जत २००१ १३२१ ६८०क.महांकाळ ७३५ ६१८ ११७आटपाडी ५७० ५३८ ३२खानापूर ७६४ ७५४ १०तासगाव ५६७ ५३७ ३०वाळवा २०७५ १७०३ ३७२शिराळा १०६६ ८३७ २२९कडेगाव ९०९ ८३२ ७७पलूस ४२४ ३९० ३४