सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली ३0 हजार एटीएम कार्डस कालबाह्य झाली असून अन्य ८५ हजार कार्डस चालू राहणार आहेत. नव्या वर्षात आता नव्या इएमव्ही चीप असलेल्या डेबिट कार्डद्वारेच ग्राहकांना व्यवहार करावे लागतील. नवीन कार्डस जिल्हा बँकेने संबंधित शाखांमध्ये उपलब्ध केले आहेत, अशी माहिती बँक प्रशासनाने दिली.सांगली जिल्हा बँकेच्या १ लाख १५ हजार ग्राहकांकडे सध्या रुपे डेबिट कार्डस आहेत. यातील ३0 हजार डेबिट कार्ड हे जुन्या मॅग्नेटिक स्ट्रीपच्या स्वरुपातील आहेत. ते बदलले गेले नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात ते आता कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे उर्वरीत ८५ हजार कार्डधारकांना कोणतीही अडचण येणार नाही. केवळ ३0 हजार कार्डधारकांना त्यांचे कार्डस बदलावे लागतील. त्यासाठी त्यांच्या शाखांमध्ये नव्या स्वरुपातील कार्डस बँकेने उपलब्ध केले आहेत.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या सुचनेनुसार दि. ३१ डिसेंबर २0१८ पासून मॅग्नेटीक स्ट्रीप असलेले निळे एटीएम कार्ड व्यवहारातून बंद होणार आहे. ज्या खातेदारांकडे मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले निळे रुपे डेबिट एटीएम कार्ड आहे, त्या खातेदारांना दि. ३१ डिसेंबर २0१८ पासून नवीन ईएमव्ही चीप असलेले रुपे डेबिट एटीएम कार्ड संबंधित शाखेत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेतून देण्यात आली.
सांगली जिल्हा बँकेचे मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले निळे रुपे डेबिट एटीएम कार्ड असलेल्या खातेदारांनी दि. ३१ डिसेंबर २0१८ पासून आपले खाते असलेल्या शाखेतून नवीन ईएमव्ही चीप असलेले रुपे डेबिट एटीएम कार्ड बदलून घ्यावे, असे आवाहन जिल्हा बँक प्रशासनाने केले आहे.कार्ड विनाशुल्क मिळणार : दिलीप पाटीलजिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, व्यवहारातील सुरक्षेकरीता ईएमव्ही चीप असलेले रुपे डेबिट एटीएम कार्ड वापरणे आवश्यक आहेत. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने तशा सुचनाही दिल्या आहेत. त्यानुसार मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले निळे एटीएम कार्ड धारक खातेदारांना विनाशुल्क नवीन ईएमव्ही चीप असलेले एटीएम कार्ड देण्यात येतील.यापूर्वीही केले होते आवाहनजिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांच्या ग्राहकांना यापूर्वीही नवे एटीएम कार्डस घेण्याबाबत आवाहन केले होते. जुन्या कार्डस्च्याऐवजी नवीन कार्ड बदलून घेण्यातची प्रक्रिया सुरू होती. अनेक ग्राहकांनी याचा लाभ घेतला होता.