शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सांगली : आरवडेतील ५० जणांना विषबाधा,  प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 2:52 PM

आरवडे (ता. तासगाव) येथील ५० जणांना तासगाव येथे एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. तात्काळ या सर्वांना आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे आरवडेतील ५० जणांना विषबाधाप्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथील ५० जणांना तासगाव येथे एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. तात्काळ या सर्वांना आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.आरवडे येथील ग्रामस्थ एका लग्नसमारंभासाठी तासगावला गेले होते. तासगावमधील एका खासगी मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. विवाहानंतर जेवण करून सर्वजण गावी परतले. रात्री यापैकी अनेकांना त्रास जाणवू लागला.

अचानक जुलाब व उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे अनेकांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली, तर काहीजण शुक्रवारी सकाळी आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी कमी पडू लागल्याने मांजर्डे, डोर्ली, गौरगाव येथील वैद्यकीय पथक बोलावण्यात आले.पितांबर चव्हाण, प्रशांत बबन पाटील, अशोक शंकर चव्हाण, प्रतीक बाबासाहेब चव्हाण, बाळासाहेब विनायक चव्हाण, सुनीता भानुदास कदम, वेदांत विजय कदम, शुभम पांडुरंग चव्हाण, जयसिंग चव्हाण, स्वप्नील महादेव चव्हाण, श्रीमंत धनंजय पाटील, सुनीता वसंत पाटील, आदित्य सुनीलराव चव्हाण, सुशांत जनार्धन खंडागळे, रमेश कृष्णा शिंदे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

अन्य रूग्णांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतले.वैद्यकीय अधिकारी डी. बी. मस्के, एल. एस. माने, बी. ए. माळी, एस. एस. इंगवले, रंजना पवार यांच्यासह पथकाने उपचार केले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात