सांगली, दि. २४ : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आणि दिवाळी संपण्याच्या पूर्वसंध्येला संप मागेही घेतला. दिवाळीत शेवटचे दोनच दिवस प्रवाशांच्या गर्दीचा फायदा मिळाल्याने सुमारे २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. संप नसता तर हा आकडा आणखी वाढला असता.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी १७ आॅक्टोबरपासून संपाची हाक दिली होती. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले होते. ऐन दिवाळीत संप सुरू झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पोलिस, प्रशासन व आरटीओ यांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वडाप वाहने बस स्थानकावर उभी केली होती. वडाप व रिक्षाला गर्दी वाढली होती. रेल्वेही हाऊसफुल्ल होती.
चार दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी २१ आॅक्टोबरला संप मागे घेतला. त्याचदिवशी सकाळी सातपासून एसटीची थांबलेली चाके पुन्हा पळू लागली. शुक्रवारी भाऊबीज असल्याने प्रवाशांची गावाला जाण्यासाठी गर्दी होती. गर्दी लक्षात घेऊन कोल्हापूर, इचलकरंजी, कºहाड, सातारा व पुणे या मार्गावर एसटीच्या १४ फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या.
दिवाळी संपल्यानंतर शनिवारी गावाकडे आलेल्या नोकरदारांची पुन्हा नोकरीवर जाण्यासाठी लगबग सुरू होणार असल्याने मुंबई, पुणे या मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. विशेषत: याच मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होती.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने एसटीची सेवा सुरळीत सुरू झाल्याची माहिती अनेक प्रवाशांना नव्हती. त्यामुळे शनिवारी भाऊबिजेदिवशी प्रवाशांची फारशी गर्दी झाली नाही; पण दुसऱ्यादिवशी रविवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने त्याचा सांगली आगाराला उत्पन्नाच्या माध्यमातून फायदा झाला. सांगली आगाराचे दररोज सरासरी ६० ते ७० लाखांच्या आसपास उत्पन्न आहे.
पहिल्यादिवशी (२१ आॅक्टोबर)
फेऱ्या : २९४किलोमीटर : ३५ हजार ०२०प्रवासी : १६ हजार ३९९उत्पन्न : ८ लाख ६५ हजार ३७३
दुसऱ्या दिवशी (२२ आॅक्टोबर)फेऱ्या : २९९किलोमीटर : ५७ हजार ७०२प्रवासी : २२ हजार ०२२उत्पन्न : १६ लाख ३३ हजार ९४४दोन दिवसांचा एसटीचा एकूण प्रवासफेऱ्या : ५९३ ४किलोमीटर : ९२ हजार ७२२ ४प्रवासी : ३८ हजार ४२१ ४उत्पन्न : २४ लाख ९९ हजार ३१७