शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Sangli- अमणापूर मारहाण प्रकरण: खूनी हल्ला करणाऱ्यास दीड वर्षाचा सश्रम कारावास

By अविनाश कोळी | Published: January 10, 2024 6:55 PM

शेतातील बांधावरुन भांडण

पलूस : पलूस तालुक्यातील अमणापूर येथील मारहाणप्रकरणी पलूस येथील न्यायालयाने एकास दोषी ठरवत दीड वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पलूस तालुक्यातील अमणापूर येथील अरुण पांडुरंग लोहार हे त्यांचा मुलगा प्रशांत याच्यासोबत शेतात सरबांधावरील कट सरळ करण्याकरिता गेले होते. बांधाच्या हद्दीप्रमाणे काठ्या रोऊन माती ओढून कुंपण तयार करत असताना आरोपी मुरलीधर जालिंदर मुळीक (वय ३५, रा. अमणापूर) हा हातात तलवार घेऊन तेथे आला. ‘तुम्ही येथे माती ओढून घ्यायची नाही’, असे म्हणून भांडण काढले. फिर्यादी व त्याच्या मुलाच्या हातावर तलवारीने वार करून जखमी केले. शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देऊन निघून गेला होता. त्यांनतर फिर्यादी यांनी पलूस पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याप्रमाणे पलूस पोलिस ठाण्यात १ जानेवारी २०१३ रोजी कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचा निकाल पलूस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. खान यांनी दिला.

आरोपी मुरलीधर मुळीक याला १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व कलम ३२४ साठी ६ महिने सश्रम कारावास व ५ हजार दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्यात पलूस पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सरकारी वकील सुवर्णा भोसले, सुवर्णा पाटील, कोर्ट पेरवी अंमलदर मनीषा पाटील यांनी योगदान दिले.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय