शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

सांगलीच्या बाजार समितीची बहात्तर वर्षांत अधोगतीच जादा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 3:31 PM

राजकीय उदासीनतेचा फटका येथील बाजाराला बसला

सांगली : सांगलीबाजार समितीस ७२ वर्षे झाली असून या कालावधीत मूलभूत सुविधांसह उलाढाल वाढणे अपेक्षित होते. पण, खाबुगिरीमुळे येथील गूळ, हळद आणि बेदाण्याची बाजारपेठ जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होत आहे. ५० टक्के उलाढालीवर परिणाम होऊनही त्याकडे बाजार समितीने गांभीर्याने लक्ष दिले नाही.जवळपास पाऊणशे वर्षाच्या या काळात बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या, मात्र राजकीय उदासीनतेचा फटका येथील बाजाराला बसला. त्यामुळे यात ना शेतकऱ्याचे भले झाले, ना व्यापाऱ्यांचे. नियोजनशून्य कारभारामुळे अनेक तोटे सहन करावे लागले. बाजार समिती म्हणजे राजकारणाचा व खाबुगिरीचा अड्डाच बनल्याचे चित्र दिसून येत आहे.व्यापारी मालामाल, शेतकरी कंगालहळद, बेदाणा आणि गुळाच्या सौद्यात तेजी-मंदी करून व्यापारी मालामाल होत आहेत. एखादा सौदा जादा रकमेचा काढून उर्वरित माल मातीमोल किमतीने खरेदी करून शेतकऱ्यांना त्यांनी कंगाल केले आहे. काही व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घालूनही बाजार समितीने त्याकडे लक्ष दिले नाही. मार्केट यार्ड बदनाम झाल्याबद्दल व्यापारी नाराज आहेत.सांगलीतील शीतगृहाच्या जागेवर पाडले दुकानगाळेविष्णूअण्णा फळ व कांदा-बटाटा मार्केटमध्ये शीतगृहाची सोय नसल्याने बाहेरच्या राज्यासह देशातील फळे सौद्यासाठी थेट येत नाही. शीतगृहाची जागा बाजार समिती संचालकांनी व्यापाऱ्यांच्या घशात घालून लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.पार्किंगचा प्रश्न कोण सोडविणार?महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, गुजरातमधून शेतमाल घेऊन रोज शेकडो वाहने मार्केट यार्डात येत असतात. या वाहनांसाठी पार्किंगची सुविधाही नाही. त्यामुळे बाजारात अस्ताव्यस्त वाहने लावली जातात.

संचालकांशी आर्थिक लागेबांधे असल्यामुळे ते व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला पाठीशी घालत आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा नाहीत. शेतकरी निवास संचालक आणि त्यांचे बगलबच्चे वापरत आहेत. ३६ कोटींच्या ठेवीवरही संचालकांनी डल्ला मारला आहे. - संजय कोले, शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजारPoliticsराजकारण