शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

फटाक्यांच्या आतषबाजीत उजळली सांगली

By admin | Published: October 30, 2016 11:37 PM

बाजारपेठेत दिवसभर गर्दी : पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन; उत्सवाच्या उत्साहाला उधाण

सांगली : उत्सवाच्या निमित्ताने उत्साहाला आलेले उधाण... लक्ष दिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळलेले शहर... रांगोळी, फुले आदी साहित्यांनी केलेली आरास आणि भक्तिमय वातावरणात रविवारी सांगलीत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. घरोघरी तसेच व्यापारी पेठांमध्ये सायंकाळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. रविवारी जिल्ह्यासह शहरात दिवसभर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. कुटुंबासह व्यवसायात स्थिरता, आर्थिक स्थैर्य देणाऱ्या लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहावा, या प्रार्थनेसह जोरदार आतषबाजी करत शहरात रविवारी सायंकाळी लक्ष्मी पूजन उत्साहात पार पडले. लक्ष्मी पूजनावेळी दिव्यांचा झगमगाट, फुलांचा सुवास, उदबत्तीचा घमघमाट याने वातावरण प्रसन्न झाले होते. खास दिवाळीसाठी खरेदी केलेले नवीन कपडे, दागिने घालून घराघरांत नागरिक सजले होते. यावेळी घरातील सोने, चांदी, पैशाचीही पूजा करण्यात आली. लक्ष्मी पूजनादिवशी केरसुणीला लक्ष्मीचेच स्थान दिले जाते. त्यामुळे आज त्याचीही खरेदी करण्यात आली. अनेकांची दिवाळी खरेदी आधीच झाली असली, तरी आजही खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आजच्या खरेदीत आयत्या वेळची धावपळ जाणवत होती. व्यावसायिकांनी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी दारावर लावलेल्या फुलांच्या तोरणांमुळे भक्तिमय वातावरण तयार झाले होते. त्यातच दीपमाळांचा झगमगाट सणाच्या आनंदाला अधिक बळ देत होता. सायंकाळी दुकानदारांनी दुकानात पूजा केली. रात्री आठच्या सुमारास घराघरांत, दुकानात पूजन झाले. त्यानंतर जोरदार आतषबाजीने उत्सव साजरा करण्यात आला. शहरात विशेषत: व्यावसायिकांनी लक्ष्मी पूजनानिमित्त दुकानांना आकर्षक सजावट केली होती. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत फटाके उडविण्याचा आनंद घेतला. अंगण नाही, तेथे रस्त्यावरच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यामुळे आसमंत उजळून निघाला होता. (प्रतिनिधी)